Site icon Shelke Tech

महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना | पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेचे संपूर्ण माहिती बघणार आहोत.
यामध्ये या योजनेकरिता पात्रता काय आहे आणि कोण कोणते कागदपत्र लागतात व तसेच ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करता येतील याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया.

महाराष्ट्र म्हणजेच संतांची भूमी म्हणून ओळखले जाते तसेच या मातीमध्ये अनेक संत धर्मगुरू होऊन गेले. शेकडो वर्षांपासून भक्ती मार्गाचा हा परंपरा लाखो लोकांमध्ये चालत येत आहे. भगवंताचे चिंतन, नामस्मरण करीत वारकरी आणि देवतांचे भक्त असे आयुष्य जगत आहेत.

गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये


अनेक नागरिकांचे आपल्या हिंदू धर्मातील चार धाम यात्रा, माता वैष्णवी देवी यात्रा, आणि असे अनेक तीर्थस्थळी जाण्याचे स्वप्न असतात. किमान त्यांच्या आयुष्यामध्ये एका वेळेस तरी जाण्याची इच्छा नागरिकांना असतेच.
परंतु आर्थिक परिस्थितीमुळे लाखो लोक त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. अशी ही बाब महाराष्ट्र सरकारने विचारात घेऊन सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळी जाण्याकरिता ही योजना राबविले जात आहे.
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक असलेले पुरुष किंवा स्त्री भारतात असलेल्या सर्व तीर्थ स्थळे विनामूल्य दर्शनाची संधी या योजनेअंतर्गत केली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना माहिती
योजनेचे नावमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
उद्दिष्टज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळी जाण्यास मोफत उपलब्ध करून देणे.
योजनेचा GRView
Official Website

या योजनेकरिता एक व्यक्ती एकाच वेळेस याचे लाभ घेऊ शकतात. या योजनेमध्ये प्रवासाचा खर्च जास्तीत जास्त 30 हजार रुपये इतकी दिली जाईल. यामध्येच तुम्हाला प्रवास भोजन किंवा इतर काही आवश्यक गोष्टींचाही समावेश असेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

योजनेसाठी पात्रता

योजनेसाठी अपात्रता

मुख्यमंत्री वयोश्री योजना

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

भारतातील तीर्थक्षेत्रे (मंदिरांचे नाव आणि स्थान)
मंदिराचे नाव स्थळ
चिंतामणी (कळंब) यवतमाळ
दीक्षाभूमी नागपूर
अष्ट दशभूज (रामटेक)नागपूर
श्री काळेश्वरी मंदिरसातारा
महाकाली देवीचंद्रपूर
मारलेश्वर मंदिररत्नागिरी
गणपतीपुळेरत्नागिरी
पावसरत्नागिरी
वैजनाथ मंदिर परळीबीड
केदारेश्वर मंदिरबीड
श्री दत्त मंदिर औदुंबरसांगली
एकवीरा देवी कारलापुणे
संत गजानन महाराज मंदिर शेगाव बुलढाणा
बल्लाळेश्वर मंदिर पालीरायगड
श्रीक्षेत्र भगवानगड पाथर्डी अहमदनगर
शनी मंदिर शनिशिंगणापूरअहमदनगर
सिद्धिविनायक मंदिरअहमदनगर
संत साईबाबा मंदिर शिर्डीअहमदनगर
गजपंतनाशिक
जैन मंदिर मांगी तुंगीनाशिक
काळाराम मंदिरनाशिक
सप्तशृंगी मंदिरनाशिक
मुक्तिधामनाशिक
त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबकेश्वरनाशिक
संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वरनाशिक
विघ्नेश्वर मंदिरनाशिक
जैन स्मारके, एलोरा लेणी छत्रपती संभाजी नगर
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ छत्रपती संभाजी नगर
संत एकनाथ समाधी पैठण छत्रपती संभाजी नगर
तुळजाभवानी मंदिर धाराशिव
श्री संत नामदेव महाराज देवस्थाननांदेड
खंडोबा मंदिर माळेगावनांदेड
गुरुगोविंद सिंग समाधी साहेबनांदेड
रेणुका देवी मंदिर माहूरनांदेड
जैन मंदिर कुंभोजकोल्हापूर
ज्योतिबा मंदिरकोल्हापूर
महालक्ष्मी मंदिरकोल्हापूर
शिखर शिंगणापूरसातारा
विठोबा मंदिर पंढरपूरसोलापूर
संत सावता माळी समाधी मंदिरसोलापूर
संत चोखामेळा समाधीसोलापूर
संत तुकाराम महाराज समाधी देहूपुणे
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरपुणे
संत ज्ञानेश्वर समाधी आळंदीपुणे
खंडोबा मंदिर जेजुरीपुणे
महागणपती मंदिर रांजणगावपुणे
गिरिजात्मज मंदिर लेण्याद्रीपुणे
चिंतामणी मंदिरपुणे
मयुरेश्वर मंदिर मोरगावपुणे
अग्नि मंदिरठाणे
सेंट जॉन्स ब्याप्टीस्ट चर्चठाणे
मगेन डेविड सिनेगोग भायखळामुंबई
शार हरहमिम सिणेगोग मज्जिद भंडारमुंबई
नेसेट एलियाहू सिनेगॉग फोर्टमुंबई
गोदीजी पार्वत मंदिर मुंबई
सेंट जॉर्ज द ब्याप्टीस्ट चर्च मरोळमुंबई
सेंट जॉर्ज द ब्याप्टीस्ट चर्च, औद्योगिक क्षेत्र अंधेरीमुंबई
सेंट अँड्रू चर्च मुंबई
चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ केवेल मुंबई
विश्व विपशना पॅगोडा गोराई मुंबई
वाळकेश्वर मंदिर मलबार हिल मुंबई
मुंबादेवी मंदिर मुंबई
माऊंट मेरी चर्च मुंबई
चैत्यभूमी दादरमुंबई
महालक्ष्मी मंदिरमुंबई
सिद्धिविनायक मंदिरमुंबई

वरील संपूर्ण तीर्थस्थळी मोफत भेट देऊ शकता आणि या योजनेचे लाभ घेऊ शकता. या पोस्टमध्ये काही अडथळे किंवा समस्या तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारू शकता.

मी दिलेली माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना व आपल्या नातेवाईकांना पाठवा धन्यवाद.

Exit mobile version