ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रुपये E-shram card Yojana in Marathi

ई श्रम कार्ड योजना

ही योजना 2021 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना,कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा पोर्टल सुरू केला आहे. असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या कोणतीही व्यक्ती या कार्डसाठी अर्ज करू शकतो. या कार्डचे अनेक फायदे आहेत, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत आणि यासाठी पात्रता थोडक्यात माहिती आपण या पोस्टमध्ये बघूया.

ह्या पोर्टलचा युज करून राज्यामध्ये/केंद्रामध्ये असंघटित रित्या काम करणाऱ्या कामगारांचा डेटा तयार केला जाणार आहे. ज्या अंतर्गत असंघटित क्षेत्रात कामगार स्वतःची नोंदणी स्वतः देखील करू शकतात. किंवा सीएससी सेंटर वरून देखील नोंदणी करू शकता.

लाडकी बहीण योजना

ई श्रम कार्ड म्हणजे काय?

जी व्यक्ती असंघटित क्षेत्रात काम करते तो व्यक्ती विश्राम कार्ड साठी अर्ज करू शकतो. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या 60 वर्षानंतर पेन्शन ,मृत्यू विमा, जर काही घडल्यास अपंगत्व आल्यास आर्थिक मदत असे अनेक फायदे या कार्डद्वारे मिळू शकतात. या योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर 12 अंकी UAN क्रमांक दिला जातो.

ई श्रम कार्ड माहिती

योजनेचे नावइ श्रम योजना
योजनेची सुरुवातऑगस्ट 2021
लाभार्थीलाभार्थी असंघटित क्षेत्रातील कामगार
पेन्शन3000 हजार रुपये प्रति महा
मृत्यू विमा200000/- रुपये

ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती

ई श्रम योजना उद्देश

सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे जसे की रिक्षा चालक, बांधकाम कामगार, शेती कामगार, सफाई कामगार असे अनेक काम आहेत त्यांचे डेटाबेस तयार करणे. स्थलांतरित होणाऱ्या कामगारांची पत्ता आणि त्यांचे सध्याचे स्थान हे संपूर्ण हालचाली औपचारिक क्षेत्रातून अनौपचारिक क्षेत्रामध्ये हालचाल करणे आणि तसेच त्या उलट स्थलांतरित आणि बांधकाम कामगार सुरक्षेसाठी कल्याण दायक लाभाची पोर्टेबिलिटी.
भविष्यात कोविड-19 सारख्या कोणत्याही संकटेचा सामना करायचा असेल तर या डेटाबेस वरून राज्य आणि केंद्र सरकार यांना एक डेटाबेस प्रधान करणे.

ग्रामपंचायत कर आणि फी नियम

ई श्रम कार्ड योजनेसाठी पात्रता
  • असंघटित क्षेत्रातील कामगार
  • वय 16 ते 59 वर्ष
  • मोबाईल नंबर
  • आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • भारतातील रहिवासी

ई श्रम कार्ड योजनेचे फायदे
  • या योजनेमधून पेन्शन साठी अर्ज केल्यास असंघटित क्षेत्रातील कामगारांना 3000 हजार रुपये प्रतिमा त्यांच्या 60 वर्षानंतर मिळतील.
  • या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा मृत्यू विमा
  • अपघातीमध्ये अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये विमा

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

ई श्रम कार्ड आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • आधार कार्ड ला असंलग्न मोबाईल नंबर

ई श्रम कार्ड नोंदणी
  • ई श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी मुख्य संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकता.
  • स्वयं नोंदणी करण्यासाठी ई श्रम पोर्टल आणि (UMANG)उमंग मोबाईल ॲप द्वारे.
  • कॉमन सर्विस सेंटर (CSC) किंवा आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) मध्ये भेट देऊन नोंदणी करू शकता.

घरबसल्या पहा शेत जमीचा नकाशा

ई श्रम कार्ड डाउनलोड कसे करावे

ईश्रम कार्ड साठी अर्ज केल्यानंतर खालील पद्धतीने मिश्रण कार्ड डाउनलोड करू शकता.

  • सर्वप्रथम ई श्रम पोर्टलला भेट देणे
  • आधीपासूनच नोंदणी केले आहे या बटन वर क्लिक करून यूएन नंबर पर्याय निवडा.
  • तुमचा 12 अंकी UAN नंबर टाकून OTP पाठवून द्या.
  • मिळालेली OTP टाकून सबमिट वरती क्लिक करा
  • ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्यासमोर ही श्रम कार्ड डाउनलोड बटन दिला जाईल, त्यावरती क्लिक करून ई श्रम कार्ड डाउनलोड करायचा आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर

ई श्रम कार्ड मध्ये नोंदणी करण्यासाठी काही अडचण असेल तर खाली दिलेल्या व्हिडिओ पाहून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
आणि तसेच पेन्शन साठी अर्ज करत असाल तर तो देखील व्हिडिओ पहा आणि अर्ज करा.

यामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारू शकता.

Leave a Comment