तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स वापरली जात आहेत? घरबसल्या जाणून घ्या!

SIM Card : आजच्या या डिजिटल युगात सिम कार्ड हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अतिशय महत्वाचा भाग बनला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या नावावर किंवा आधार कार्डवर किती सिम कार्ड्स आहेत? काहीवेळा आपल्या नावावर अनोळखी व्यक्ती सिम कार्ड वापरत असतात, ज्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये आपले नाव अडकण्याची भीती असते. यावरच आपण या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत आणि त्याची माहिती कशी मिळवायची, सोबतच यासंबंधी काही सावधगिरी आणि उपाययोजना. चला तर मग सुरू करूया!

तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत हे कसे तपासाल?

भारत सरकार च्या दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) यासाठी Telecom Analytics for Fraud Management and Consumer Protection नावाचे पोर्टल चालू केले आहे. या पोर्टलद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवर नोंदणीकृत सर्व सिम कार्ड्सची माहिती मिळवू शकता.

  1. वेबसाइट: tafcop.dgtelecom.gov.in किंवा sancharsaathi.gov.in वर जा आणि TAFCOP सेक्शन निवडा.
  2. तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका आणि Captcha Code भरून ‘Request OTP’ वर क्लिक करा.
  3. तुमच्या मोबाइलवर आलेला OTP टाका आणि “Login” करा.
  4. लॉगिन केल्यानंतर तुमच्या आधार कार्डवर नोंदणीकृत सर्व मोबाइल नंबर्सची यादी दिसेल. यामध्ये नंबर चे पहिले चार आणि शेवटचे चार अंक दिसतील.
  5. यादीतील प्रत्येक नंबर काळजीपूर्वक तपासा. जर एखादा नंबर तुम्ही वापरत नसाल किंवा तुमच्या माहितीतील नसेल, तर तो “Not My Number” पर्याय निवडून रिपोर्ट करा.
  6. अनोळखी नंबरसाठी तुम्ही तक्रार नोंदवू शकता. यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर री-व्हेरिफिकेशन करेल. जर तो नंबर बेकायदेशीर असेल, तर तो 30 ते 60 दिवसांत बंद केला जाईल.

आपले रेशन कार्ड eKyc करा, 

सिम कार्ड्स च्या नियम ?

  • एका व्यक्तीला जास्तीत जास्त 09 सिम कार्ड्स घेता येतात.
  • संवेदनशील राज्यांमध्ये (जम्मू-काश्मीर, आसाम, त्रिपुरा, आणि ईशान्येकडील राज्ये) एका व्यक्तीला फक्त 6 सिम कार्ड्स घेता येतात.

जर तुमच्या नावावर यापेक्षा जास्त सिम कार्ड्स आढळली, तर तुम्हाला त्यांची पडताळणी करावी लागेल. नवीन दूरसंचार कायद्या 2023 नुसार, मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड्स घेतल्यास 50,000 ते 2 लाख रुपये दंड किंवा 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रुपये

अनोळखी सिम कार्ड आढळल्यास काय करायच ?

तक्रार नोंदवा

  1. जर तुम्हाला शंका असेल की तुमच्या नावावर बेकायदेशीर सिम वापरले जात आहे, तर जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करा.
  2. तुम्ही वापरत नसलेले किंवा जुने सिम कार्ड तात्काळ बंद करा. यासाठी तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा.
  3. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी नियमितपणे त्याचा वापर तपासा आणि बायोमेट्रिक लॉकचा वापर करा.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स सक्रिय आहेत हे जाणून घेणे हा तुमच्या डिजिटल सुरक्षेचा महत्त्वाचा भाग आहे. TAFCOP आणि संचार साथी पोर्टल्समुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि मोफत आहे. तुमच्या नावावर अनोळखी सिम कार्ड आढळल्यास तात्काळ तक्रार नोंदवा आणि आपली ओळख सुरक्षित ठेवा. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी सावध रहा आणि नियमित तपासणी करा.

Leave a Comment