मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पात्रता आणि ऑनलाइन अर्ज असे करा

नमस्कार शेतकरी बांधवांनो,
आज आपण या पोस्टमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
या योजनेचा कोणत्या लाभार्थ्याला फायदा होणार आणि यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार व ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती बघूया.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

ही योजना महा ऊर्जा म्हणजेच महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कडून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्याकडे जलस्त्रोत आहे म्हणजेच बोरवेल किंवा इतर पाणीपुरवठा विभाग आहे. आणि ज्या ठिकाणी कृषी पंपासाठी वीजपुरवठा देण्यात आला नाही. शेतकरी या योजनेच्या सहाय्याने सोलार कृषी पंप योजनेला अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे काही ठळक वैशिष्ट्ये
  • शेती सिंचन करण्यासाठी स्वतःच्या हक्काची स्वतंत्र आणि शाश्वती योजना
  • एकूण मूल्याच्या 10% मूल्य भरून संपूर्ण सौर ऊर्जेचा कृषी पंप योजनेचे लाभ
  • उर्वरित 90% अनुदान हे केंद्र सरकार व राज्य सरकार कडून दिले जाईल.
  • पंपाची इन्शुरन्स सह पाच वर्षाची दुरुस्तीसाठी गॅरंटी देखील दिली जाईल.
  • कोणत्याही प्रकारचे विज बिल नाही
  • लोड शेडिंग ची देखील चिंता राहणार नाही
  • सिंचन करण्याकरिता दिवसा व्हेज पुरवठा

गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख

लाभार्थी निवडीचे निकष

1 हेक्टर पर्यंत शेतजमीन धारकास 3 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत शेतजमीन धारकास 5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. आणि 2 हेक्टर ते 3 हेक्टर पर्यंत शेतजमीनदारकास 7.5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. यापेक्षा खालील क्षमतेच्या सौर कृषी पंपाचे मागणी केल्यास ते मान्य केला जाणार नाही.

ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर, बोरवेल असे कोणतेही बारमाही नद्या किंवा नाल्या शेजारील असेल ते शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील.

शेतकऱ्यांकडे असलेले विहीर बोरवेल किंवा नदी पाण्याचा स्त्रोत आहे का नाही याची खात्री महावितरणाद्वारे केली जाईल.
ज्या ठिकाणी जलसंधारण कामाचे पाणी जिरविण्याच्या पाण्यासाठी उपसण्यासाठी हे पंप वापरता येत नाही.
अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतकरी लाभार्थी देखील या योजनेस पात्र राहतील.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

ऑनलाइन अर्ज कसे करावे

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता महावितरणाद्वारे एक नवीन स्वतंत्र पोर्टल तयार केला आहे जे की या पोर्टलवरून या योजनेसाठी A1 हा अर्ज भरून सादर करायचा आहे. तसेच योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तावेज देखील अपलोड करावयाचे आहे.

वेबसाइट लिंक – मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

HeadingLink
Dark Water NOC format Format
सामायिक क्षेत्र NOC Format Format
शासन निर्णय पहा
Website Applyलिंक

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  1. पाणी उपलब्ध असल्याचे शेतीचा सातबारा
  2. शेतकऱ्याचे आधार कार्ड
  3. जातीचे प्रमाणपत्र असल्यास
  4. लाभार्थी शेत जमिनीमध्ये स्वतः एकटा मालक नसेल, तर इतर मालकांचा ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
  5. पाण्याचा स्त्रोत हे डार्क झोन मध्ये येत असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे / GSDA ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  6. तसेच लाभार्थ्याचे मोबाईल नंबर, ई-मेल असल्यास, आपल्या शेतामध्ये पाणी असल्यास त्या जलस्त्रोताची खोलीची माहिती व इतर माहिती भरणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा हप्ता

सौर कृषी पंप योजने करिता किती रक्कम भरावी लागेल ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतजमीनुसार सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करायचा आहे. निवडलेल्या क्षमतेचा सौर कृषी पंप त्याच्या किमतीच्या 10% रक्कम आणि अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांकडून 5% रक्कम एवढी भरावी लागेल.

Leave a Comment