जन्म दाखला मोबाईलवर असे काढा | जन्म दाखला नोंदणी / दुरुस्ती प्रोसेस | Birth Regitration Maharashtra

Birth Certificate

आजच्या युगामध्ये जन्म दाखला चा भरपूर महत्वपूर्ण असते. कारण कोणत्याही ठिकाणी आपल्याला जन्म दाखल्याची आवश्यकता भासत असते तर या जन्मदात्यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो आणि हा जन्म दाखला कसा काढायचा याची आपण संपूर्ण प्रोसेस या लेखांमध्ये बघणार आहोत.


शैक्षणिक व तसेच वाहन परवाना विवाह नोंदणी सरकारी नोकरीच्या अशा विविध कामांमध्ये जन्म दाखला एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणून सरकारी कामासाठी या पुराव्याचा वापर केला जातो.


जसे की शैक्षणिक शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी, वाहन चालक परवाना काढण्यासाठी, नवीन मतदार यादी मध्ये नाव टाकण्यासाठी, आधार नोंदणीसाठी, तसेच विवाह नोंदणी व इतर सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी या दाखल्याचा आवश्यकता असते.
यामध्ये जन्मतारीख, आपले नाव व विशेष माहिती उपलब्ध असल्यामुळे याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.


अनेकदा आधार कार्ड मध्ये किंवा इतर अन्य कागदपत्रांमध्ये नावात किंवा जन्म तारखे मध्ये काही बदल करायची असतील तर या जन्मदाखल्याच्या सहाय्याने दुरुस्ती/नवीन माहिती भर घालू करू शकतात.

रहिवाशी प्रमाणपत्र काढा

जन्म दाखला नोंदणी | Birth Certificate Registration

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती संबंधित विभागातील ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांना द्यावी लागते.
बाळाचा जन्म ग्रामीण विभागात किंवा शहरी विभागात कुठेही जन्म झाल्यास, जन्म झाला बाळाच्या जन्माची माहिती आपल्या विभागातील संबंधित कार्यालयास देणे बंधनकारक असते. या मुदतीमध्ये जन्म दाखल्याची नोंद केल्यास मोफत जन्म दाखला मिळते.
परंतु जर दिलेल्या मुदतीत जन्म नोंदणी केल्यास जन्म दाखला मिळविण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे मुदतीमध्ये न केल्याचे शुल्क आकारले जाते. बाळाच्या वडिलांचे आईचे आधार कार्ड व दवाखान्यातून मिळालेले जन्म प्रमाणपत्र या कागदपत्राच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था जन्म दाखला देते.
हा दाखला बहुतेक एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य केले जाते.

जन्म दाखला डाउनलोड करा

नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्म झाला आहे. त्याच ठिकाणी जन्म दाखला निघत असतो. जर जन्म गावात किंवा स्थानिक ठिकाणी होत असतील तर तेथील ग्रामीण विभागातील ग्रामसेवक व शहरी विभागातील नगरपरिषद तसेच महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.

जर नवीन जन्म दाखला काढायचे असतील तर अर्जदार त्याच्या शाळा सोडल्याचा दाखला, दहावी आणि बारावी शैक्षणिक पुरावे व आधार कार्ड असे अन्य कागदपत्र लागतात. त्यानंतर अर्जदारास नागरिकांना नावसहित जन्म दाखला दिला जातो.

जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जन्म दाखला दुरुस्ती | Birth Certificate Correction

जन्मदाखड्यामध्ये नाव दुरुस्ती किंवा जन्मतारीख दुरुस्ती जर करायचे असतील तर अर्जदारांकडून अफेडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. अफेडेव्हिट 100 (शंभर) रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागणार. नावात बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत, असा अर्जाचा विषय असावा.
यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, दुरुस्ती करावयाचा नाव व जे तुम्ही दुरुस्ती करणार आहात. आणि हे दुरुस्ती तुम्ही का करणार त्या मागचे कारण काय आहे? हे सुद्धा सविस्तर माहिती नोंद करावी लागणार.
हे प्रतिज्ञापत्र तुम्ही सेतू कार्यालय किंवा वकिलांकडून हे तयार करू शकता. तसेच या सोबतच अर्जदाराचे आधार कार्ड व ज्यांचे दुरुस्ती करणार आहात. त्यांचे आधार कार्ड व अन्य कागदपत्र जोडावे लागणार आहे, ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर आठवड्यात म्हणजेच 7 दिवसाच्या आत तुमचे दुरुस्तीचा जन्म दाखला मिळेल.

Leave a Comment