पोलीस पाटील विषयी माहिती | पोलीस पाटील म्हणजे काय? त्यांची कर्तव्य?

पोलीस पाटील

नमस्कार मित्रांनो
पोलीस पाटील हा गावातील सर्वात महत्त्वाचे पोस्ट असते. पोलीस पाटील हा प्रशासकीय यंत्रणेचा म्हणजेच पोलीस यंत्रणेचा व प्रजा यामधील एक महत्त्वाचा दुवा असतो. प्रत्येक गावात पोलीस पाटलाची भूमिका शांतता प्रस्थापित करण्यासाठी केली जाते.
पोलीस पाटील हा एक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तंटामुक्तीचे कार्य करतो. कारण त्या गावातील तंटामुक्तीचे समितीचे अध्यक्ष व पोलीस पाटील या दोघांनी होणाऱ्या तंटा शांततेने उठवण्याचे कार्य करत असतात.
शांतता कायम ठेवणारा हा पोस्ट गावातील विभागांमध्ये फार महत्त्वाचे पद असते.

हे वाचा – जर पोलीस पाटील गैरवर्तवणूक केल्यास कोणत्या शिक्षेस पात्र असतो..?

आजच्या या लेखांमध्ये आपण पोलीस पाटील काय आहे त्यासाठी पात्रता काय असते आणि पोलीस पाटलाची निवड कशी केली जाते आणि ते निवड कोण करतात पोलीस पाटलाचे कर्तव्य व त्याचे अधिकार अशा संपूर्ण विषयावर माहिती जाणून घेऊया.

हे वाचा – पोलीस पाटील यांचे मानधन किती?

पोलीस पाटील म्हणजे काय?

पोलीस पाटील या पदाची स्थापना 1967 साली महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केली अमल केली. तेव्हापासूनच पोलीस पाटील या पदाला महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय दर्जा दिला आहे. पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठेचे पद आहे.
खेडेगावात पोलीस पाटील म्हणजेच महत्त्वाचे घटक आहे. त्या गावातील कोणत्याही कारणामुळे जसे की खून दरोडा मृत्यू किंवा कायद्याचे उल्लंघन करत असलेल्या बाबींवर कायदेशीर प्राथमिक माहिती घेऊन पोलीस स्टेशनला कळविण्याचे काम पोलीस पाटलाचे असते.
तसेच गावातील इतर समस्या महसूल विभाग आणि पोलीस स्टेशनला संपर्क करून कळविण्याचे काम व तसेच सोडविण्याचे काम करत असतो.
प्रशासकीय विभाग व पोलीस विभाग यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील.

हे वाचा – पोलीस पाटील होण्यासाठी पात्रता

पोलीस पाटील यांची कर्तव्य

पोलीस पाटील कर्तव्य खालील प्रमाणे आहेत.

  • गाव ज्या क्षेत्रात असलेल्या कार्यकारी दंडाधिकारी च्या आदेशाचे पालन करणे.
  • एखाद्या अहवालाची मागणी केली असल्यास कार्यकारी अधिकारी यांना योग्य ते अहवाल सादर करणे.
  • गावात आलेल्या विविध कामाकरिता पोलीस अधिकाऱ्यांचे मदत करणे.
  • गावात होणाऱ्या गुन्हे आणि सर्वसाधारण समुदायांची कार्यकारी दंडाधिकारी यांना कळवणे.
  • पोलीस अधिकाऱ्यांना सर्व कामात आपल्या गावात मदत करणे.
  • विविध निवडणुका होणाऱ्या आपल्या गावात त्यांची जबाबदारी पार पाडणे.
  • गावातील होणाऱ्या तंटा मी ठेवण्याचे काम सचिव म्हणून काम पाहणे व तंटे सोडवणे.
  • गावात होणाऱ्या सार्वजनिक गुन्हे व गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी पोलिसांना मदत करणे.
  • शासनाकडून येत असलेल्या विविध निर्देशाचे पालन करणे.
  • ज्या गावात पोलीस पाटील राहतो त्या गावात सार्वजनिक शांतता बंद होण्याची शक्यता भासत असेल तर पोलीस अधिकाऱ्यांना किंवा दंडाधिकारी यांना कळविणे.
  • पोलीस अधिकारी काढून निघालेल्या वॉरंट बाबींची पालन करणे.

हे वाचा – पोलीस पाटील बनण्यासाठी परीक्षा

हे वाचा – पोलीस पाटलांची नियुक्ती कोण करते?

Leave a Comment