PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर

प्रधानमंत्री आवास योजना

घरकुल योजना : नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल किती मंजूर झाले त्याच्या विषयातून संपूर्ण माहिती घेणार आहोत.
आता यंदाच्या यावर्षी महाराष्ट्र मध्ये एकूण 20 लाख घरे मंजूर केली आहे. यामुळे गरीब कुटुंबीयांना नक्कीच फायदा होईल. एकाच वर्षात महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांना मंजुरी देऊन गोरगरीब नागरिकांना घर देण्याचे आश्वासन आणि याचा नक्कीच फायदा होईलच. गरीब कुटुंबियांना आता घर बांधण्याकरिता लवकरच फायदा होणार.

एका वर्षात महाराष्ट्रात 20 लाख घर मंजूर

मित्रांनो दरवर्षी खूपच कमी घोर गरिबांना घराचे मंजुरी दिली जात असे परंतु यंदाच्या या प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत तब्बल महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांना मंजुरी दिली आहे. जे कुटुंब गरीब आहे जे स्वतःचे घर स्वतः बांधू शकत नाही त्यांना आर्थिक मदत म्हणून घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. अशी माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून लाडक्या बहिणीच्या पैशासोबतच हक्काचे घर देखील देण्याचे आश्वासन दिले.

कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजनेच्या या योजनेमध्ये काही अटी होत्या त्यामध्ये ज्या कुटुंबाकडे दुचाकी आहे त्यांना घरकुल मिळत नव्हते परंतु सध्याच्या या अटी रद्द करून ज्यांच्याकडे दुचाकी आहे त्यांना देखील घरे देण्याचे ठरवले आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न 10 हजार रुपये मासिक होते त्यांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जात नसेल परंतु सध्याच्या या मर्यादा वाढवून 10 हजार रुपये वरून 15 हजार रुपये पर्यंत उत्पन्न ज्या कुटुंबीयांच्या असेल त्यांना या योजना लाभ घेता येईल. शेतकऱ्यांसाठी 5 एकर कोरडावाहू व आणि 2.5 बागायती जमीन असेल तरी या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो.

Leave a Comment