LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? | LIC आनंदा पोर्टल संपूर्ण माहिती

LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा?

नवीन एलआयसी (LIC) चे पॉलिसी अर्ज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया, आनंद पोर्टल वर खालील प्रमाणे केली जाते.

LIC आनंद पोर्टलवर लॉगिन करा

  • सर्वप्रथम, तुम्हाला LIC आनंद पोर्टल च्या Login Page अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
  • या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला LIC. एजेंट रजिस्ट्रेशन करून लॉगिन करायच आहे.
  • वेबसाइट वर लॉगिन केल्या नंतर (New Policy) “नवीन पॉलिसी” पर्यायावर क्लिक करा.
  • विविध प्रकारच्या पॉलिसीचे पर्याय तुम्हाला दिसतील. त्या योग्य पॉलिसी ची निवड करा.
  • तुम्हाला पॉलिसी संबंधित माहिती द्यावी लागेल. यामध्ये तुमच्या वयाची, कव्हरेज, प्रिमियम रक्कम, पॉलिसीचा प्रकार, व किमान आणि विमा रक्कम याचा समावेश असते.
  • पॉलिसी शी संबंधित सर्व तपशील काळजी पूर्वक भरायचे आहे.

लाडकी बहीण योजना

कागदपत्रे अपलोड करा

  • तुमची ओळख, पत्त्याचा पुरावा, वयाचे प्रमाणपत्र, आणि अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
    • आधार कार्ड
    • पॅन कार्ड
    • पत्ता पुरावा (रहिवासी प्रमाणपत्र, वीज बिल इत्यादी)

प्रीमियम (Premium Payment) शुल्क भरणे

  • पॉलिसीची निवड केल्यानंतर, पेमेंटचा पर्याय आणि प्रीमियम रक्कम दिसेल.
  • तुम्ही प्रीमियम शुल्क ऑनलाईन भरू शकता (ज्यामध्ये यांचा वापर करून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ई-वॉलेट इत्यादीद्वारे).

शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या

अर्ज सादर करा आणि सबमिट करा

  • सर्व माहिती तपासून, अर्ज सादर करा.
  • एकदा अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, जो रजिस्ट्रेशन नंबर पुढील प्रक्रियेसाठी उपयोगी ठरेल.
  • एकदा तुमचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाला की, तुम्हाला तुमच्या निवडलेल्या पॉलिसीबद्दल पुष्टीकरण मिळेल.
  • यासोबतच, तुमची पॉलिसी सर्टिफिकेट आणि इतर संबंधित दस्तऐवज तुमच्या ईमेल, मोबाईलवर किंवा पोस्टाने दिलेल्या पत्यावर पाठवले जातील.

  • जर तुम्हाला अर्ज सादर करताना काही अडचणी येत असतील, तर LIC कस्टमर सपोर्टशी संपर्क साधू शकता,किंवा खाली दिलेला विडियो देखील पाहू शकता.
  • तुम्ही LIC च्या हेल्पलाइन वर कॉल करू शकता किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर “Contact Us” विभागातून अधिक माहिती मिळवू शकता.

फायदे

  1. ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या, पॉलिसी घेता येते.
  2. अर्जाची प्रक्रिया जलद आणि सोपी आहे.
  3. ऑनलाइन पेमेंटसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
  4. सर्व कागदपत्रे आणि पॉलिसी प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवता येते.

ऑनलाइन अर्ज करताना, सर्व माहिती आणि कागदपत्रे खूप काळजीपूर्वक भरा. यामुळे पॉलिसीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.

घर बैठे LIC निकाले 🛑 How to Use Ananda 2.0 Portal Full Details In Hindi | How to do LIC Policy Online

Leave a Comment