मुख्यमंत्री वयोश्री योजना
महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 12 कोटी इतकी आहे. त्यातील दहा ते पंधरा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयानुसार कोणत्या ना कोणत्या अपंगत्व किंवा इतर समस्यांचा सामना करावा लागतो. याचा विचार घेऊन सरकारने डीआरडीओ म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील संबंधित जेष्ठ नागरिकांना आवश्यक असणारे साधने पुरविण्याकरिता व तसेच त्यांचे आर्थिक मदत करण्याकरिता हे वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे.
त्यांच्या जीवनातील आवश्यक साध्य होत असलेल्या समस्या दूर करून त्यांच्या जीवनाला गतिशीलता आणि तसेच मोकळेपणा ने जगता यावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांच्या वयानुसार समस्येचा विचार करून त्याच्यावर उपाययोजना म्हणून आवश्यक ते साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचे निर्णय घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्री “लेक लाडकी बहीण योजना”
पात्र असलेल्या जेष्ठ नागरिकांना योग्य उपचारासाठी किंवा साधने खरेदी करण्याकरिता म्हणून 3000/- तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांच्या आधारशी संलग्न असलेल्या बँक खाते मध्ये जमा केली जातील.
हे संपूर्ण अर्थसहाय्य या योजनेमध्ये राज्य शासनातर्फे केली जाईल. 3000/- हजार रुपये प्रत्येक पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वितरण केले जाईल.
महाराष्ट्र वयोश्री योजना पात्रता
- ज्यांचे वय 65 वर्षे पूर्ण असेल.
- आधार कार्ड ला बँक अकाउंट संलग्न राहणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असेल.
- लाभार्थ्यांचे बीपीएल राशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य आयकरता किंवा सरकारी कर्मचारी नसावे.
- ज्येष्ठ नागरिक हा केवळ महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
- कौटुंबिक राशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- बँकेचे पासबुक
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- स्वयंघोषणापत्र
- मोबाईल नंबर
- वय प्रमाणपत्र
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे काही महत्वाची माहिती
योजना | तपशील |
---|---|
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिक |
वयोमर्यादा | 65 वर्ष किंवा त्याहून अधिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाइन |
मुख्य संकेतस्थळ | लवकरच उपलब्ध |
योजनेचा अर्ज Form | अर्ज |
Form | Click View pdf |
अंतिम दिनांक | – |

वयोश्री योजना फायदे
- महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेल्या वयोश्री योजना मधून ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे लाभ खालील प्रमाणे
- राज्यातील पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून 3000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार
- ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले साधने किंवा उपकरणे मिळवून देणे.
- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना वयानुसार होणाऱ्या समस्येचा सहज जीवन जगता येणार.
- ही योजना केवळ ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय 65 वर्ष त्याहून अधिक असेल त्यांनाच दिले जाईल.
ग्रामसभेचे नियम, अटी व संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन करण्याची प्रोसेस
मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज करण्याची इच्छुक असणाऱ्यांनी खालील प्रोसेस फॉलो करा.
- सर्वप्रथम मुख्य संकेत स्थळाला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर आल्यानंतर नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
- संपूर्ण नोंदणी करून घेतल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला समोर दिलेल्या सर्व आवश्यक असलेल्या योग्यरीत्या माहिती प्रविष्ट करा.
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- त्यानंतर शेवटी सबमिट या पर्यायी बटनाचा वापर करून सबमिट करा.
- अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
- तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाइन कसा तपासायचा? | How to Check Challan
- घरकुल यादी 2025 मोबाईलवर कशी पाहावी | Gharkul Yojana List Download
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2025-26 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
- TVS EMI Payment आता करा CSC पोर्टलवरून | घरबसल्या कर्ज भरण्याची संपूर्ण माहिती
- 👩 लाडक्या बहिणींसाठी सरकारची नवी योजना – महाराष्ट्र पिंक ई-रिक्शा योजना 2025
- पी एम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज कसा कराल? | Solar Pump Yojana Apply
- बॅटरी व सौर फवारणी पंपसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – Battery & Solar Operated Favarni Pump Online Apply
- नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होणार 🛤️ Nanded – Mumbai Vande Bharat Express Timetable
- MGNREGA Job Card Download | काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे, संपूर्ण माहिती
- AH-MAHABMS अंतर्गत सरकारी नोकरी – पात्रता, कागदपत्रे व अधिकृत माहिती
- AH-MAHABMS योजना – पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती
- AH.MAHABMS | शेळी,दुधाळ गाय आणि म्हैस करीता ऑनलाईन फॉर्म सुरु ५० ते ७५% अनुदान मिळण्याची शक्यता.