कमी पैशात सुरू करा नवीन बिजनेस | नंतर होईल लाखोंची कमाई
बेरोजगार युवा कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो परंतु त्यासाठी त्याला नवीन बिजनेस ची संधी आवश्यक असते. व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजारातील मागणी व इतर गोष्टी अभ्यासणे आवश्यक असते. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक बेरोजगार युवा साठी स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारतर्फे अनेक योजना सुरू केले आहेत जेणेकरून बेरोजगार व्यक्ती स्वतः रोजगार मिळू शकतो. छोटीशी रक्कम गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करून चांगलीच फायदा करून घेऊ शकता.
महाराष्ट्र : शहरी विभागात असो किंवा गाव खेड्यांमध्ये प्रत्येक युवा आज बेरोजगार संख्या जास्तीत जास्त दिसत आहे. बेरोजगारीची ही संख्या कमी करण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व तसेच असलेल्या व्यवसायात भर घालण्यासाठी असे अनेक योजना राज्य सरकार व केंद्र सरकारतर्फे राबविल्या जात आहेत.
कोणतेही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या बाजारपेठामध्ये मागणी काय आहे आणि त्या बाजारपेठेचे महत्त्वाचे व्यवसाय काय आहेत हे सर्व बाबींची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.
आजच्या या पोस्टमध्ये तुम्हाला अशाच एका छोट्या गुंतवणूक करून चांगला फायदा मिळविण्याचा व्यवसायाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
बाजारात अनेक व्यवसाय आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून योग्य ते नफा मिळवू शकता त्यातील ही एक
हा व्यवसाय तुम्ही तुमच्या गावात राहून सुद्धा करू शकता. हा व्यवसाय म्हणजेच आपल्या घरातील एलईडी बल्ब तयार करणे होय. एलईडी बल्ब तयार करण्यासाठी कोणकोणते सामग्री लागणार आणि ते बल्प इतर बल्प पेक्षा किती आकर्षक राहणार याची देखील माहिती असणे आवश्यक.
हे वाचा – प्रधानमंत्री सूर्योदय योजना फ्री (Free) वीज मिळणार जाणून घ्या..
एलईडी बल्ब (LED Bulb)
एलईडी बल्ब हा प्लॅस्टिकचा असल्या कारणांमुळे तुटण्याची किंवा सहजासहजी फुटण्याची भीती नसते. बाजारामध्ये अनेक बल्ब आहेत ज्यांची आयुष्य साधारणपणे त्यांच्या निर्धारित वेळेनुसार आहे.
एलईडी बल्ब चा व्यवसाय (LED Bulb Business)
अगदी थोड्याच गुंतवणूक करून एलईडी बल्बचा व्यवसाय तुम्ही तुमच्या गावातूनच सुरू करू शकता कमी गुंतवणूक करण्याचा हा सर्वोत्तम व्यवसाय आहे. कोणतेही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सूक्ष्म, लघु आणि मध्यम म उद्योग व मुद्रा योजना यामधून तुम्ही याचे प्रशिक्षण देखील घेऊ शकता. एलईडी बल्ब तयार करण्यासाठी तुमच्या जवळील एलईडी बल्ब बनवणाऱ्या कंपन्याशी संपर्क साधा व त्यातील माहिती गोळा करा. त्यासाठी लागणारे संपूर्ण सामग्री व इतर माहिती जमा करा.
एलईडी बल्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण (Bulb Business Training)
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 50000/- रुपये पासून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. अनेक योजनांमधून प्रशिक्षण घेते वेळेस त्या प्रशिक्षणा दरम्यान तुम्हाला पीसीबी चे बेसिक, एलईडीचे बेसिक, ड्रायव्हर, फिटिंग आणि टेस्टिंग आणि कोण कोणते सामग्री लागणार हे संपूर्ण माहिती तुम्हाला प्रशिक्षणामध्ये दिला जातो. ज्याच्या सहाय्याने प्रशिक्षणानंतर तुम्ही स्वतः हा व्यवसाय घरी बसून आरामात हा व्यवसाय सुरू करू शकता.
हे वाचा – How to Book Train Ticket Online
बल्ब व्यवसायापासून कमाई (Business Income)
बाजारामध्ये एक बल्ब सहज 100 रुपयाला विकला जातो परंतु तेच बल्ब तयार करण्यासाठी तुमच्याकडे फक्त पन्नास रुपये खर्च येतो म्हणजेच तुम्ही अंदाज करू शकता तुमच्या एका बल्ब वरती नफा दुप्पट असते. जर एका दिवसात तुम्ही 50 बल्ब बनवत असतील तर दिवसाचे तुमच्याकडे 2500 रुपये कमाई होईल. अशाच पद्धतीने दर महिना तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे अंदाज सहज ठरवू शकता किती असेल.
गावात सुरू करण्याचे नवीन व्यवसाय लगेच सुरू करा कमी खर्चात. यातील कोणतेही व्यवसाय तुम्ही घरून स्वतः करू शकता ते पान कमी खर्चात, आज च माहिती गोळा करा तुमच्या बाजार पेटची..
हे वाचा – बाल संगोपन योजना 2024 | बाल संगोपन योजना महाराष्ट्र
Low Investment & High Return Business Ideas
कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असे व्यवसाय
- कपड्याचे दुकान
- लेडीज इम्पोरियम (महिलांच्या वापराच्या वस्तू)
- मोबाईलचे दुकान
- किराणा दुकान आणि जनरल स्टोअर
- इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे दुकान होम अप्लायन्सेस
- जुन्या गाड्या विकण्याचा व्यवसाय
- ट्रॅव्हल एजन्सी
- ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर बिजनेस
- स्टडी पॉईंट
- हॉटेल
- प्रिंटेड कपडे आणि ॲक्सेसरीज
- ज्यूस सेंटर
- शैक्षणिक क्लासेस
- सलून
- मंडप आणि सजावट व्यवसाय
- ग्राहक सेवा केंद्र
- यूट्यूब चॅनेल
- ब्लॉगिंग
- ऑनलाइन विक्री करणे
- सीएससी सेंटर
असे कित्येक नवीन बिजनेस करण्याचे आयडिया आहेत जे तुम्ही तुमच्या गावात सुद्धा करू शकता यामध्ये कमी गुंतवणूक आणि जास्त नफा मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत.
आणखी कोणत्या व्यवसायाविषयी माहिती घ्यायची असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जाणून घ्या जास्तीत जास्त माहिती.
Thanks for another great post.