नमस्कार मित्रांनो
शिधापत्रिका /राशन कार्ड धारकांना मिळणार धान्य ऐवजी पैसे..
आता महाराष्ट्र सरकारकडून शिधापत्रकधारकांना मिळणाऱ्या मोफत राशन बद्दल आणि 2/3 रुपये प्रति किलो धान्य (तांदूळ, गहू) देण्याबाबत नवीन निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयामध्ये दर महिना शिधापत्रिका धारकांना आता पैसे देण्याची योजना राबविण्यात येथील.
राशन बद्दल पैसे देण्याची ही योजना नक्की काय आहे ? या पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला राशनकार्ड संबंधी नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तसेच या योजनेसाठी कोण पात्र राहणार ? याची पण वर्णन केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड अपडेट कशी करायची ?
PM किसान Correction करे ऑनलाईन
राशन बद्दल पैसे देण्याची ही योजना नक्की काय आहे ?
स्वस्त धान्य दुकानात तीन रुपये प्रति किलो तांदूळ आणि दोन रुपये प्रति किलो गहू अशाप्रमाणे धान्य देण्याची योजना चालू होती, ही योजना केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे धान्य दिले जात होते. पण मागच्या काही काळात/दिवसात सरकार मार्फत येणाऱ्या स्वस्त धान्य बंद झाल्यामुळे जनतेमध्ये लाभार्थ्यांमध्ये असंतोष पसरला. धान्य देण्याची ही योजना सप्टेंबर 2022 पासून बंद करण्यात आली आहे.
तसेच या योजनेसाठी प्रत्येक लाभार्थी स्वस्त धान्य दुकानासमोर रांगेत उभा टाकून धान्य घ्यावे लागत होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्या महिन्यातील कोटा एक्सपायर होत असल्या कारणाने तसेच लाभार्थी काही कारणांमुळे गावात नसतील, किंवा कोणत्यातरी इतर कामासाठी बाहेर गेले असल्यामुळे त्यांना धान्य मिळणे कठीण होत असे. यामुळे जनतेमध्ये असंतोष होत असे.
गरीब लाभार्थ्यांची अशी अनेक अडचणी विचार करून आता या योजनेमध्ये धान्य ऐवजी पैसे देण्याची योजना आखली आहे.
राशन कार्ड धारकांना आता स्वस्त धान्य ऐवजी पैसे दिले जातील. हे पैसे थेट राशन कार्ड चे कुटुंब प्रमुख यांच्या खात्यात पैसे जमा होतील. लाभार्थ्यांचे उत्पन्न मात्र 59000 (ऐकोणसाठ हजार) ते 100000 (एक लाख) पर्यंत असावे अशाच कुटुंबांना प्रतिवर्ष 9000/- (नऊ हजार) रुपये मिळतील, त्यांना या योजनेचा लाभ घेता येतील.
जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती…
या योजनेसाठी पात्र कोण ?
- ज्यांचे उत्पन्न 59000 (ऐकोणसाठ हजार) ते 100000 (एक लाख) पर्यंत आहे.
- शिधापत्रिक धारक
- महाराष्ट्राचे नागरिक
- Bank Passbook (Head Of Family)
- Aadhar Link To Ration Card
- Aadhar Card
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड अपडेट कशी करायची ?
- ह्या योजनेमध्ये स्वस्त धान्य ऐवजी पैसे दिले जात असल्याकारणामुळे पैसे प्राप्त करण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक आहे.
- प्रतिवर्षी 9000 रुपये कुटुंबप्रमुखांच्या बँक खात्यात जमा होतील.
- उदाहरणार्थ : 04 (चार) लोकांच्या कुटुंबीयांसाठी 36 हजार रुपये प्रति वर्ष दिले जातील या पैशातून तुम्ही बाजारातून तांदूळ गहू किंवा इतर धान्य खरेदी करू शकता आणि आवश्यक ती गरजा पूर्ण झाल्यावर इतर बाबींसाठी पैसे वाचतील तर दुसऱ्या ठिकाणी पण खर्च करू शकता.
अशाप्रकारे तुम्ही शिधापत्रक धारकांची ही नवीन अपडेट होती अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजवर फॉलो करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
Very nice post. I definitely appreciate this site.