PM किसान योजनेसाठी पात्रता..? अर्ज कसा करावा..? त्याची संपूर्ण माहिती

पी एम किसान योजनेचे खालील काही पॉईंट्स आपण आज बघूया.

नमस्कार मित्रांनो,
आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहात प्रधानमंत्री किसान योजना. ह्या योजनेचे संपूर्ण डिटेल्स आपण आज बघणार आहोत. यामध्ये पीएम किसान योजना कोणासाठी योग्य आहे,आणि त्यासाठी कोण पात्र आहे.तसेच त्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा..? हे सगळे पॉईंट्स आज बघूया.
या योजनेमध्ये शेतकरी स्वतः अर्ज करू शकतो. आणि तसेच त्याला येणाऱ्या प्रत्येक पीएम किसान ट्रांजेक्शन किंवा स्टेटस स्वतः चेक करू शकतो. एम किसान योजनेच्या कोणत्याही कामासाठी आता शेतकऱ्याला कुठेही जाण्याची शक्यता पडणार नाही.

या योजनेसाठी अर्ज करण्याचा आणि तसेच पीएम किसान स्टेटस कसे बघायचे ह्या सगळ्यांचे व्हिडिओज आपल्या या यूट्यूब चैनल वरती अवेलेबल आहेत

ते आपण बघून समजून घेऊ शकता. Click Here

पी एम किसान योजना काय आहे..?

ही योजना शेतकरी कुटुंबीयांसाठी राबविण्यात आलेली स्कीम आहे. या योजनेमध्ये भारत देशातील सगळे शेतकरी भाग घेऊ शकतात. ही योजना इसवी सन 2019 पासून भारत देशात राबवत आहे. या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना वार्षिक 6000/- रुपये मानधन म्हणून दिले जाते, सहा हजार रुपये वर्षात‌ समान वेळेस अर्थात एका वर्षात तीन वेळेस (2000/- रुपये दर तीन महिन्याने) शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये टाकले जातात.
या योजनेमुळे गरीब शेतकऱ्यांचे आर्थिक मदत होते.

किसान योजनेचे फायदे
  • शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति वर्ष मिळतात.
  • शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य होते.
  • या योजने अंतर्गत शेतकरी योग्य व्याजदराने कर्ज मिळू शकतो.

पी एम किसान योजनेसाठी पात्रता
  • या योजनेसाठी शेतकरी भारताचा नागरिक हवं.
  • ही योजना फक्त भारतातील शेतकरीच घेऊ शकतात.
  • ज्यांच्या नावाने शेती आहे त्यांनीच ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PM किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा..?

या योजनेकरिता शेतकरी भारताचे नागरिक आणि अन्य पात्रतेचे अटी मान्य करत असल्यास अर्ज करू शकता.
तुम्ही शेतकरी असाल आणि वरील पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही पी एम किसान या संकेतस्थळावर जाऊन पण अर्ज करू शकता,

अथवा जवळच्या सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन पण अर्ज करू शकता.
या योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरायचे असल्यास तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मधून पण अर्ज करू शकता.

त्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये पी एम किसान चे प्ले स्टोर मधून ॲप डाऊनलोड करावा लागेल, Pm KIsan ह्या ॲपच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने शेतकरी आपल्या स्मार्टफोन मधून अर्ज करू शकतो.

New Registration Click Here

पी एम किसान साठी कोण कोणते कागदपत्र लागणार,..?
  • शेतकऱ्यांचा आधार कार्ड
  • शेतीचा सातबारा 7/12 आणि 8अ
  • शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर

हे सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाइन अर्ज करते वेळेस तुम्हाला पीएम किसान संकेतस्थळावर किंवा पी एम किसानच्या मोबाईल ॲप मध्ये अपलोड करावे लागेल.
ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काही दिवस वाट पहावी लागेल.

तुमचे फॉर्म मान्य अथवा अमान्य केले हे तुम्हाला कळवले जाईल.

जर तुमचा फॉर्म अमान्य केले असेल तर तुम्हाला अमान्य केल्याचे कारण दिले जाईल त्यानुसार तुम्ही त्या फॉर्मची प्रोसेस करावी लागेल.

अशाप्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वतःच्या मोबाईल मधून किंवा सीएससी सेंटर व आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करू शकता.

पी एम किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन अर्ज कसा करावा.

किसान क्रेडिट कार्ड साठी आपण आपल्या जवळच्या सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता.
किसान क्रेडिट कार्ड वरती कर्ज हवे असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेची संपर्क साधावा.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना पण कळवा.

1 thought on “<strong>PM किसान योजनेसाठी पात्रता..? अर्ज कसा करावा..? त्याची संपूर्ण माहिती</strong>”

Leave a Comment