LIC Plans
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये LIC 5 पॉलिसी ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील अशा योजनांचे तपशील तुमच्यासमोर आणले आहेत.
योजनांचे तपशील व इतर माहिती तपासून योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि अनेक फायदे व त्याचा लाभ घ्या.
जर तुम्ही व्यवसाय करत आहात किंवा नोकरी करत असाल कोणतेही काम केल्यास तुम्हाला बचत करणे हे खूप महत्त्वाचे आहे.
बचती शिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही. योगिता ठिकाणी बचत करणे हे सुद्धा एक चांगली उत्तम गुणवत्ता आहे.
आता बचत केल्याने येणाऱ्या भविष्यात तुम्हाला बचतीचा चांगला परतावा मिळू शकतो भविष्य सुरक्षित करण्यासाठी आतापासूनच तुम्ही बचतीची सवय स्वतःला व आपल्या परिवाराला लावली पाहिजे.
ज्यामुळे आपला परिवार व स्वतः भविष्यातील येणाऱ्या काळाला आपण सुरक्षिततेने या योजनांचे सहाय्य घेऊन पार पाडू शकतो.
स्वतः किंवा परिवाराला बचतीची सवय लावून आत्ताच्या कालावधी पासून बचत केल्यास येणाऱ्या भविष्यात तुमची सुरक्षितता करण्यासाठी या योजनांचे फार मोठे आधार होऊ शकतो.
बचत करते वेळेस ज्या प्रकारे तुम्ही बचत करत आहात तेवढ्या सुरक्षिततेने चांगली विमा देखील निवडण हे देखील महत्त्वाचे आहे.
पण तुम्ही कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा सर्वोत्तम पर्याय म्हणून कोणते योजना निवडू शकता? कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी? अशा पद्धतीचे सर्व प्रश्नांचे उत्तर या एका लेखांमध्ये तुम्हाला भेटणार आहेत.
कोणत्या योजना तुमच्यासाठी लाभदायी असेल? कोणती योजना तुमच्या भविष्यात तुम्हाला आधार देऊ शकतो? ह्या सगळ्या योजनांची आपण तपशील बघूया.
LIC मोजक्या 5 योजनांबद्दल मी या लेखांमध्ये सांगणार आहे जे की तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही आणि कमी गुंतवणूक मध्ये भविष्यात जास्त परतावा कशा पद्धतीने मिळवता येईल याच योजना चे तपशील बघूया.
या योजनांमध्ये 18 ते 65 वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनांमध्ये गुंतवणूक करता येतील.
LIC Best Return Plans
1) LIC जीवन अमर | LIC Jeevan Amar Plan
जर तुमची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यास किंवा तुम्हाला कमी किमतीच्या विमा हवे असल्यास एलआयसी जीवन अमर योजना ही खूप चांगली व उत्तम पर्याय आहे. ज्या लोकांना कमी किमतीच्या विमा मध्ये उच्च विमा रकमेसह परतावा हवे असतील तर त्यांच्यासाठी ही योजना योग्य राहील.
पॉलिसीची मुदत तुमच्या ठरावानुसार म्हणजेच 10 वर्ष ते 40 वर्षाच्या दरम्यान राहील.
या विम्याची रक्कम 25 लाख रुपये पेक्षा जास्त राहणार नाही.
2) LIC टेक टर्म प्लॅन | LIC Tech Term Plan
हे सुद्धा एक मोदक विमा पॉलिसी आहे. कमी किमतीच्या विमा मध्ये उच्च विमा रकमेसह परतावा देण्याचा दावा ही योजना करत असते. या पॉलिसीसाठी वय अठरा वर्षे ते 65 वर्षे इतके असावे. पॉलिसीची मुदत हे 10 वर्ष ते 40 वर्षाच्या दरम्यान असू शकतो.
3) LIC न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन | LIC New Children Money Back Plan
ही पॉलिसी एक इंडोमेंट योजना आहे. यामध्ये मुलांच्या आर्थिक सुरक्षा बळकट करण्यासाठी ही योजना वापरली जाते. या योजनेसाठी योजनेची मुदत आहे 25 वर्ष. अशा योजनांचे लाभ घेण्यासाठी वय मर्यादा 0 ते 12 वर्ष राहावे लागतील. ही योजना किमान एक लाख रुपये पासून ते अमर्यादित रकमे पर्यंत असू शकतो. ह्या योजनाची मॅच्युरिटी वय 25 वर्ष असेल.
4) LIC नवीन जीवन आनंद | LIC New Jeevan Aanad
ही योजना सर्वात उत्तम पर्याय आहे या योजनेमध्ये संरक्षण व तसेच बचत अशा प्रकारच्या दोन्हीही संधी प्रधान करते. ही एक इंडोमेंट योजना आहे. या योजनेमध्ये पॉलिसी धारकाचे भविष्य व तसेच बचत या दोन्ही गोष्टी येतात. यामुळे पॉलिसीधारकाला भविष्यातील उद्भवणाऱ्या आर्थिक परिस्थिती ला संरक्षण भेटतात. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पॉलिसी धारकाचे वय मर्यादा 18 ते 50 वर्ष इतके असणे आवश्यक. पॉलिसी मुदत 15 वर्षे ते 35 वर्ष दरम्यान आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान विमा रक्कम एक लाख रुपये पासून ते अमर्यादित रकमे एवढा असू शकतो.
5) LIC जीवन उमंग | LIC Jeevan Umang
ही योजना सगळ्यात वेगळी व पॉलिसी धारकाला त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या कालावधी संरक्षण प्रधान करत असते. ज्यांना जीवनविण्यासह बचत करण्याची सवय हवी असेल तर त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत उत्तम पर्याय आहे. यामध्ये पॉलिसी टर्म शंभर 100 इतके आहे. या योजनांसाठी पॉलिसीधारकाचे वय 90 दिवस ते 55 वर्ष इतके असणे आवश्यक. या योजनाची मॅच्युरिटी 100 वर्ष आहे. पण पॉलिसीधारकाला या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी विमा रक्कम दोन लाखापासून ते अमर्यादित रकमे एवढा असेल.
अशा प्रकारच्या या 5 LIC Plans लाभदायी व बचतीची सवय लावणारी आपल्या भविष्याला सुरक्षा प्रधान करण्यासाठी ह्या योजना कामी येऊ शकतात.
कोणत्याही योजनेमध्ये लाभ घेते वेळेस किंवा पॉलिसी काढते वेळेस आपल्याला किती रकमेचा विमा सहजरित्या भरू शकतो तेवढ्याच विम्याचा हप्ता व रक्कम एवढी काढावी.
मी दिलेली माहिती आवडल्यास आपल्या जवळील मित्रांना व तसेच बांधवांना हा मेसेज शेअर करा.