मुख्यमंत्री “लेक लाडकी बहीण योजना” या योजनेमध्ये 1500 रुपये मिळणार प्रत्येक महिलेला

मुख्यमंत्री लेक लाडकी बहीण योजना

महिलेला आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे.
राज्यामध्ये लोकसंख्येनुसार पुरुषांची 59% तर स्त्रियांची 29 टक्के इतकी आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधार करण्यासाठी या योजनेचे फार मोठे योगदान ठरेल.
महिलांच्या आरोग्य व आर्थिक स्वावलंबनासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत त्यातील ही एक योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे.

या योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना स्वतःच्या आधार लिंक असलेले बँक खात्यात 1500/- रुपये दर महा एवढी रक्कम दिली जाईल.

महाराष्ट्र राज्यामध्ये त्या महिलेचे वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील असणे अनिवार्य आहे आणि त्यामध्ये विधवा, घटस्फोट, निराधार महिला आणि विवाहित.

मतदान कार्ड डाउनलोड कसे करायचे आहे

ह्या योजनेचे मुख्य उद्देश
  • महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
  • महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी
  • महिलांच्या आरोग्य दृष्टीने त्यांची सुधारणा करण्यासाठी.
  • महिलांना सशक्तीकरणास चालना मिळण्यासाठी

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनांसाठी पात्रता
  • महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
  • त्यांची वय किमान 21 वर्ष पूर्ण आणि कमाल 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असावे.

ग्रामपंचायत कर आणि फी नियम

योजनांसाठी अपात्रता
  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त आहे.
  • कुटुंबातील व्यक्ती आयकरदाता/टॅक्सपेयर असेल.
  • शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या इतर योजनेद्वारे 1500 रुपये पेक्षाही जास्त लाभ घेतला आहे.
  • ज्या कुटुंबाचे शेतजमीन दोन हेक्टर (पाच एकर) पेक्षाही जास्त आहे.
  • ज्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावाने असेल.

लाडकी बहीण योजना काही महत्वाचे दुवा
लाडकी बहीण योजनालिंक
AppDownload
WebsiteOfficial Site
हमीपत्रDownload
अर्ज Download

या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत.
  • योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
  • आधार कार्ड लाभार्थ्याचे
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र / मतदान कार्ड / जन्म दाखला (असल्यास)
  • उत्पन्न दाखला / रेशन कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स लाभार्थ्याची
  • पासपोर्ट साईज फोटो
  • राशन कार्ड
  • हमीपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला (असल्यास)

लेक लाडकी योजना माहिती, अर्ज, कागदपत्रे व पात्रता

लाभार्थी निवड प्रक्रिया
  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी लाभार्थ्यांनी सेतू सुविधा केंद्र|ग्रामपंचायत|अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करावी.
  • ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी आपल्या जवळील अंगणवाडी सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र व तसेच ग्रामपंचायत मध्ये देखील अर्ज करू शकता.
  • शहरी विभागामध्ये अंगणवाडी सेविका किंवा वार्ड अधिकारी व तसेच सेतू सुविधा केंद्र या मार्फत अर्ज सादर करावे.

या योजनेसाठी अर्ज सेतू सुविधा केंद्र किंवा मोबाईल ॲप द्वारे देखील भरले जाऊ शकतात. अर्ज भरण्याची ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्ज करते वेळेस लाभार्थी स्वतः उपस्थित असणे अनिवार्य आहे जेणेकरून अर्ज करते वेळेस लाभार्थ्यांचा फोटो काढता येईल आणि त्यांची ई केवायसी देखील करता येईल.

या योजनेची संपूर्ण कालावधी
  • अर्ज करण्यासाठी 01 जुलै 2024 पासून सुरुवात करण्यात येते.
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक असेल 15 जुलै 2024. 31/08/2024
  • तात्पुरती यादी 16 जुलै 2024 रोजी प्रकाशित करण्यात येतील.
  • यादीमध्ये काही तक्रारी किंवा हरकती करण्याची कालावधी असेल 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024
  • तक्रारीचे निवारण 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 पर्यंत करण्यात येतील.
  • या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची अंतिम यादी एक ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित केले जाते.
  • आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे 14 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेल्या पात्रधारकांना 1500 रुपये निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील.

Leave a Comment