घरबसल्या पहा शेत जमीचा नकाशा, सातबारा आणि फेरफार आपल्या मोबाइल वर

शेत जमीन विषयी माहिती

नमस्कार शेतकरी बांधवांनो
आज आपण या पोस्टमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बद्दल संपूर्ण माहिती घरबसल्या कशाप्रकारे काढू शकता हे आपण बघूया.
प्रत्येक शेतकरी बांधवांच्या घरी अँड्रॉइड फोन किंवा स्क्रीन टच फोन असेलच. त्या फोनमध्ये तुम्ही तुमच्या शेत जमिनीचे नकाशे त्याचे फेरफार आणि सातबारा असे अनेक माहिती मोबाईल मध्ये तपासू शकता.
सध्याच्या या युगामध्ये सर्व काही आपल्या मोबाईलवरच उपलब्ध आहेत ते फक्त कशाप्रकारे ऑनलाइन तपासू शकता त्याची माहिती असणे आवश्यक आहे.


ते माहितीच देण्याकरिता आपल्या पेज ला फॉलो करा तुम्हाला संपूर्ण शेती विषयक माहिती देखील पोहोचवू.
आपल्या मोबाईल मध्ये शेतीचे गट नंबर टाकून त्या शेत जमिनीचा नकाशा फेरफार आणि सातबारा कशाप्रकारे तपासायचे आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत.

प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतजमिनीची मोजणी करण्याची इच्छुकता असतेच परंतु मोजणी करण्यासाठी आता टेपची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या मोबाईल द्वारे देखील शेताची मोजणी देखील करू शकता. ते कशाप्रकारे करू शकता याची देखील संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चैनल ला व तसेच आपल्या पेज वरती उपलब्ध आहेत.

दोन लाखाच्या आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले

शेत जमिनीचा नकाशा कसा पाहायचा
  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये https://bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईट वरती जावे लागणार.
  • वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वप्रथम विभाग निवडा
  • विभाग निवडल्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.
  • त्यानंतर मॅप वरती क्लिक करायचे आहे.
  • मॅप वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण नकाशा स्क्रीन वरती ओपन होईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या संपूर्ण शेत जमिनीचा नकाशा बघू शकता.

असा पहा ऑनलाईन फेरफार
  • सर्वप्रथम या वेबसाईट वरती जा
  • त्यामध्ये तुम्हाला आपली चावडी हा पर्याय निवडा.
  • आपली चावडी या पर्यायांमध्ये सातबारा फेरफार हा निवडा.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.
  • दिलेला कॅपचा टाकून आपली चावडी पहा यावरती क्लिक करा.
  • एवढे करतात तुमच्यासमोर तुमचा सातबारा फेरफार असो किंवा मालमत्ता पत्रक फेरफार असो हे सगळे फेरफार बघू शकता.

असा भरा ऑनलाइन एक रुपयात पिक विमा

असा पहा ऑनलाईन सातबारा
  • सर्वप्रथम या संकेतस्थळावरती यायचं आहे.
  • संकेतस्थळावर आल्यानंतर तुमचा विभाग निवडून गो या बटणावरती क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा गाव तालुका हे सगळे निवडून समोर जायचं आहे.
  • त्यानंतर तुमच्या शेताचे गट नंबर टाकायचे आणि कॅपच्या टाकून समोर जायचं आहे.
  • सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा सातबारा उपलब्ध होईल.
  • जे की तुम्ही सहजरीत्या त्याचा पीडीएफ प्रिंट देखील करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या घरबसल्या तुमच्या मोबाईल मध्ये देखील ऑनलाईन शेत जमीन सातबारा फेरफार आणि नकाशा सहज तपासू शकता.

यासंबंधी काय डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता.


त्याच्यासंबंधी व्हिडिओ देखील पाहू शकता जे की खाली दिलेला आहे.

Leave a Comment