कोतवाल पद विषयी संपूर्ण माहिती
कोतवाल पद हा पण फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. पोलीस पाटलाच्या मदतीस म्हणून काम पाहत असतो. मुंबई गाव निर्मूलन कायदा 1958 फेब्रुवारी 1963 पासून कनिष्ठ ग्रामसेवक प्रणाली संपुष्टात आली. त्यानंतर गावातील लोकसंख्येवरून कोतवालाचे निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली पोलीस पाटील आणि तसेच तलाठी यांना प्रशासनाच्या कामात मदत करणारा एक नोकर म्हणजेच कोतवाल होय.
कोतवाल हे पद महसूल विभागात अत्यंत महत्त्वाचे पद आहे .
कोतवाल हा सरकारी कामात 24 तास बांधीत असतो, कोतवाल पूर्वी वेळी काम करणारा कनिष्ठ ग्रामसेवक आहे, कोतवालाची निवड गावच्या लोकसंख्येवरून ठरवले जाते. मात्र एका गावात एकाहून अधिक कोतवाल पद निवडण्याचे काम शासकीय अधिकारी जिल्हाधिकाऱ्याकडे असते.
कोतवाल पदाची निवड महसूल विभागात केली जाते.
कोतवाल निवड पात्रता
- तहसील अधिकाऱ्यांकडून निवड केली जाते.
- शिक्षण चौथी पास असणे आवश्यक.
- चारित्र्यवान व तसेच शारीरिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे.
- संबंधित गावाचा रहिवाशी असणे अनिवार्य.
- कोतवाल म्हणून निवड प्रक्रियेत भाग घेण्यासाठी किमान वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.
कोतवालाचे चालू मानधन
7500 रुपये
नमुना नं 8 चा उतारा | Namuna No 8 pdf in Marathi
कोतवालाची अधिकार आणि कर्तव्य
- शासकीय रक्कम शासकीय तिजोरीमध्ये भरण्यास मदत करणे.
- गावकऱ्यांना चावडी वरती बोलून आणणे.
- शासकीय कागदपत्रे आणि वसुली म्हणून जप्त केलेल्या शासकीय मालमत्तेवर लक्ष ठेवणे.
- जप्त केलेल्या मालमत्तेला चावडीवर घेऊन येणे.
- शासकीय अधिकाऱ्यांना पीक पाहणी, हदीच्या खुणा तपासण्यास मदत करणे.
- नोटीस किंवा शासकीय अधिकाऱ्याकडून मिळालेले संदेश गावामध्ये अंमलबजावणी करणे.
- पोलीस पाटील व तलाठी यांना मदत करणे.
- गावातील मृत्यू, जन्म, लग्न यांची माहिती ग्रामपंचायत सचिवालयाला देणे.
- आवश्यक त्यावेळी गावकऱ्यांना चावडीवर बोलावणे, हे कोतवाल करतो.
- शासनाच्या नोटीस विषयी गावात दवंडी देणे.
- पोलीस पाटलांच्या आरक्षणात असलेल्या गुन्हेगारावर पहारा देणे.
- कोणत्याही मोहिमेवर शासनाची मदत करणे.
- साथीचे रोग या प्रकारच्या रोगांवर पोलिस पाटलांची मदत करणे.
- शासकिय अधिकाऱ्यांना महसूल वसुली सहाय्य करणे.
कोतवाल वरती नियंत्रण
- तलाठ्याचे नियंत्रणाचे कोतवालावर असते.
- कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस पाटील कोतवालावर नियंत्रण ठेवतो.
1 thought on “<strong>कोतवाल पदा विषयी संपूर्ण माहिती – शैक्षणिक पात्रता, निवडप्रक्रिया, मानधन, अधिकार आणि कर्तव्य</strong>”