Site icon Shelke Tech

उत्पन्नाचा दाखला असा करा अर्ज | कागदपत्रे,अर्ज करण्याची प्रोसेस,फ्री मध्ये डाउनलोड,संपूर्ण माहिती | Income Certificate Required Documents In Marathi

income ccertificate

उत्पन्नाचा दाखला

अनेक ठिकाणी शाळेत असो किंवा कोणत्याही व्यवहारात शासकीय लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला हा एक महत्त्वाचा दस्तावेज असून उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचे आहे आणि ते किती दिवसात तुम्हाला भेटणार त्याची संपूर्ण माहिती यामध्ये बघूया.

उत्पन्नाचा दाखला हा दैनंदिन जीवनात शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये लाभ घ्यायची असतील तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, त्यावरून तुम्ही शासकीय कोणतेही लाभ घेऊ शकता.

उत्पन्नाच्या दाखल्यावरून कौटुंबिक उत्पन्न किती आहे यावरून त्या विद्यार्थ्यांना किंवा लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ घेता येते. उत्पन्न प्रमाणामध्ये पालकांचा किंवा त्याच्या कुटुंबाचा उत्पन्न दर्शविले जाते.

ओळखपत्र & रहिवाशी प्रमाणपत्र pdf

उत्पन्न प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे

उत्पन्न स्वयंघोषणापत्र | Income Certificate Self Declaration

Income Certificate Required Documents List

रहिवाशी दाखला ग्रामसेवक व सरपंच

उत्पन्न प्रमाणपत्र साठी ऑनलाईन अर्ज प्रोसेस

ऑनलाइन अर्ज दोन पद्धतीने करू शकता. A) आपले सरकार (स्वतः अर्ज करू शकता) B) सेतु केंद्र भेट देऊन

A) आपले सरकार (स्वतः अर्ज करू शकता)

  1. तुमच्या ब्राउझरमध्ये Aaple Sarkar हा संकेतस्थळ ओपन करा.
  2. आपले सरकार महाऑनलाईन या पोर्टल वरती आल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करून घ्या.
  3. नोंदणी अगोदरच झाली असेल तर लॉगिन हा पर्याय निवडून लोगिन करा.
  4. तुमच्यासमोर तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल, त्यामध्ये महसूल विभाग निवडायचा.
  5. मिळकतीचे प्रमाणपत्र शोधून त्यावर क्लिक करायचं आहे.
  6. मिळकतीच्या प्रमाणपत्रासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते वरील प्रमाणे स्कॅन करून सेव करून ठेवायचे आहेत.
  7. मिळकतीच्या प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर योग्य ती माहिती ऑनलाईन भरून घ्यायची आहे.
  8. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहेत.
  9. त्यानंतर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शुल्क भरायची आहे.
  10. शुल्क भरल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही भरलेल्या शुल्क व सुविधेचा पावती निघेल, ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं.

अशा पद्धतीने तुम्ही स्वतः घरी बसल्या ऑनलाईन तहसील कार्यालयाला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये काही अडचण असतील तर व्हिडिओ पाहून सुद्धा अर्ज करू शकता.

B) सेतु केंद्र भेट देऊन

उत्पन्नाचा दाखला हा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काढता येईल यामध्ये तुम्हाला महाऑनलाईन सेतू सुविधा केंद्राला भेट द्यावे लागणार आहे त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण फॉर्म भरून घेतील तिथूनच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळून जाईल.

तलाठी अहवाल pdf डाउनलोड करा

उत्पन्न दाखला स्वयंघोषणा पत्र pdf

ऑनलाइन अशा दोन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला असो किंवा तहसील कार्यालयातील कोणतेही प्रमाणपत्र असो ऑनलाईन अर्ज करून सहजरीत्या प्राप्त करू शकता.

उत्पन्न प्रमाणपत्रासाठी लागणारी कालावधी ही 15 दिवस आहे, 15 दिवसाच्या आत तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र मिळून जाईल.
जर कालावधी जास्त लागत असतील तर तक्रार नोंद करू शकता.

जर तुम्हाला स्वतः घरी बसून कायचे असतील तर हा विडियो पहा, किंवा जर तुम्ही स्वतः आपले सरकार vle असाल तर 2 nd no विडियो पहा.

Self Online Application

Aaple Sarkar Vle

Thank You

Caste Certificate Maharashtra | Application Process | Documents Required | जात प्रमाणपत्र कागदपत्राची यादी व संपूर्ण माहिती

Non Creamy Layer Certificate Required Documents | Online Application Process & Other

Domicile Certiifcate Required Documents | How to Get Domicile Certificate | आदिवासी प्रमाणपत्र कसे काढावे

Exit mobile version