ई पीक पाहणी झाल्याच शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई व इतर शासनाची लाभ

रब्बी हंगाम : खरिफ हंगामाच्या शेवटी व रब्बी हंगामाच्या सुरुवातीस झालेल्या जोरदार पावसामुळे पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. तरी खरीप च्या पिकाला व तसेच रब्बीच्या पिकाला, दोन्ही पिकांना पावसाचा फटका बसला असून शासनाकडून नुकसान भरपाईसाठी देण्याचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेताची पिक पाहणी स्वतः करणे अत्यंत आवश्यक आहे.

“ई पिक पाहणी म्हणजेच आपल्या शेतात कोणत्या प्रकारचे पीक आहे, त्याची उल्लेख सातबारा वरती नोंद करणे हे होय.”

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणी ॲप वर्जन 2 डाऊनलोड करा आणि स्वतःच्या शेतातील पिकांची ई पिक पाहणी तपासणी करून अपलोड करा.

हे वाचा – अतिवृष्टी, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक | असे करा आधार प्रमाणीकरण

खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे पिकाचे फार नुकसान झाले आहे, त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतातील ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे.

सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंदणी असल्यामुळे तुमच्या शेतात एकूण किती पिकांची नुकसान झालेली आहे, त्याची भरपाई करण्याची रक्कम शासन ठरवली जाते.

ई पिक पाहणी द्वारे सरकारला तुमच्या शेतातील पिकांची माहिती मिळते व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई रक्कम ठरवून तुम्हाला तुमच्या बँक खाते मध्ये पाठवते.

हे वाचा उत्पन्नाचा दाखला असा करा अर्ज | कागदपत्रे,अर्ज करण्याची प्रोसेस,फ्री मध्ये डाउनलोड,संपूर्ण माहिती 

त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेताची पिक पाहणी करणे आवश्यक आहे.
इ पीक पाहणी करण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पाहून सुद्धा मोबाईल मधून करू शकता.

Leave a Comment