फक्त 2 मिनिटात मिळवा तुमच्या मोबाईल वरून तुमचे मतदान कार्ड – Download Election Card

How to Download Election Card

मतदान कार्ड – लोकशाही प्रधान म्हणून भारत देशाला ओळखले जाते.
लोकशाही म्हणजे काय
मताधिकाराच्या सहाय्याने खुल्या व निःपक्षपाती निवडणूक द्वारे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी द्वारे राज्य चालवणे.
ज्या ठिकाणी लोकांसाठी लोकच राज्य चालवतात यालाच लोकशाही देखील म्हटले जाते.


या लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी मतदान येत असतो. मतदान करण्याचा हक्क भारतातील प्रत्येक नागरिकाला आहे. मतदान करण्यासाठी मतदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याच मतदाराला मतदान कार्ड दिले जाते. मतदान कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून देखील वापर करता येते. मतदान यादी मध्ये नाव येण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

नवीन मतदान कार्ड काढा

मतदान कार्ड हे एक भारतातील नागरिकांचे ओळखपत्र म्हणून देखील भारतातील नागरिकांना वापर करता येते.

मतदान कार्ड डाउनलोड

मतदान कार्ड मधील माहिती
  • मतदान कार्ड हे ओळखपत्र असून यामध्ये नागरिकांचे नाव, संपूर्ण पत्ता ,वय आणि संपर्क क्रमांक देखील असतो.
  • निवडणूक आयोगाकडून तयार केलेल्या मतदान कार्ड हे आता कलरफुल राहणार आहे. ज्याचा वापर कुठेही सहजरित्या केला जाऊ शकते.
  • मतदान कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला द्यावे लागणार नाही आणि हे संपूर्ण प्रोसेस निशुल्क राहणार आहे.
  • स्वतः मोबाईल मधून देखील अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील जिल्हा परिषद शाळेत देखील अर्ज करू शकता.

नवीन आधार कार्ड डाउनलोड

मतदान कार्ड डाउनलोड प्रोसेस
  • सर्वप्रथम शासनाचे https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरती जायचं आहे.
  • या संकेतस्थळावरती पहिल्यांदा गेला असाल तर तुमचे नवीन खाते तयार करायचा आहे.
  • खाते तयार केल्यानंतर साइन इन करायचा आहे.
  • साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल जे की ज्यामध्ये तुम्हाला नोंदणी करायचे असेल किंवा बदल करायचे असेल त्या ऑप्शन मधून निवडायचे आहे.
  • मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड इलेक्शन कार्ड वरती क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर एपिक नंबर टाकून आपला स्टेट सिलेक्ट करून सर्च करायचा आहे.
  • एवढे करतात तुमच्या मतदान कार्डाला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी पाठविला जातो.
  • तू ओटीपी टाकून व्हेरिफाय करून डाऊनलोड बटन वरती क्लिक करून तुमचा कलरफुल मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.
  • अशा पद्धतीने तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल मध्ये देखील तुमचा मतदान कार्ड किंवा इतरांचे मतदान कार्ड देखील डाउनलोड करू शकता.

या प्रोसेस मध्ये काय डाऊट असेल तर खाली दिलेल्या संपूर्ण व्हिडिओ पाहून देखील करू शकता.

मतदान कार्डचे काही फायदे
  • नागरिकाला मतदान करण्याचा हक्क मिळेल.
  • नागरिकांना एक भारताचे नागरिक म्हणून ओळखपत्र दिले जाईल.
  • चांगले व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून निवडून आणू शकता येते.
  • लोकशाहीचा योग्य वापर करता येते.
  • मतदानाचा हक्क प्राप्त होतो.
  • भारताचे नागरिक म्हणून ओळख दिले जाते.
  • असे अनेक फायदे आहेत जे मतदान कार्ड मुळे होतात.

Leave a Comment