जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता
अनुसूचित जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक विभागातील अभ्यासक्रमासाठी आरक्षण प्राप्त करण्यासाठी किंवा आरक्षण असलेल्या त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जातीच्या प्रमाणपत्रासोबतच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून केली जात आहे, यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून जातीचा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळवून घेणे हि आवश्यक आहे.
जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विविध ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापना केली आहे. अर्जदार/मागासवर्गीय विद्यार्थी विविध ठिकाणी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आपला प्रस्ताव या समितीकडे सादर करावा लागतो.
जात पडताळणी समिती आपल्या जातीच्या दाखल्यांची पडताळणी करून आपल्याला किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किंवा अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्र देते.
त्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र खाली दिलेल्या प्रमाणे आहेत.
Download Nirgam Utara in marathi pdf
Caste Validity Required Documents List
जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट/कागदपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराचे प्रवेश पत्र (Allotment Letter)
- अर्जदाराचा जन्म दाखला असल्यास
- अर्जदाराचे प्राथमिक शाळेचे टीसी व तसेच निर्गम
- अर्जदाराचा जातीचा दाखला
- अर्जदाराच्या वडील चुलते आजोबा किंवा पंजोबा यांचे प्राथमिक शाळेचे टीसी व निर्गम उतारा
- अर्जदाराच्या वडील चुलते आजोबा किंवा पंजोबा यांचे जात प्रमाणपत्र
- अर्जदाराच्या नातेवाईकांकडे जात पडताळणी असल्यास जात वैधता प्रमाणपत्र
- वंशावळी शपथ पत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर
- Affidavits
- जातीचा उल्लेख असलेल्या विविध कागदपत्रे पुरावे
- जातीचा उल्लेख असलेला नमुना क्रमांक 14 चा उतारा
- कासरा पाहणी पत्रक चा उतारा (क पत्रक)
- इतर अधिक पुरावे असल्यास, शाळेचे प्रवेश पत्र, निर्गम उतारा, सातबारा, 1967/1920/1950/1961/1995 मधील जातीचा पुरावा (तहसील, महसूल रेकॉर्डनुसार)
- तसेच इतर कागदपत्र ज्यावरती तुमच्या जातीचा उल्लेख केलेला असेल ते सगळे कागदपत्रे अपलोड आणि कार्यालयामध्ये जमा करावे.
Download Birth,death,Marriage… Certificates pdf in Marathi
ऑनलाइन जात प्रमाणपत्र काढण्यासाठी व तसेच जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करता येईल याचे संपूर्ण डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेले आहे जे की तुम्ही ते बघून पण अर्ज करू शकता.व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
At last, something worth reading. It’s great to find posts like this one.