Caste Certificate Maharashtra | Application Process | Documents Required | जात प्रमाणपत्र कागदपत्राची यादी व संपूर्ण माहिती

जात प्रमाणपत (Caste Certificate)

नमस्कार मित्रांनो,
आज आपण या पोस्टमध्ये जात प्रमाणपत्र म्हणजे काय? आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ? जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता ? ह्या सगळ्या बाबी बघूया.
जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी हा खास पोस्ट आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग या जातींच्या वर्गांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार या पोर्टल वरती जाऊन कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते तपासावे.
जर कोणी जातीचे प्रमाणपत्र काढत असतील तर त्यांच्यासाठी हा पोस्ट खूपच लाभदायक होऊ शकतो. पुढे सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे गोळा करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

महाराष्ट्रात जातीचे प्रमाणपत्र हा एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज असून याचा उपयोग संबंधित जातीच्या आरक्षणाच्या ठिकाणी केला जातो. जातीच्या प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन घरबसल्या अर्ज करून सुद्धा नागरिक मिळवू शकतात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसला भेट देण्याची आवश्यकता राहणार नाही, या संबंधित सगळे प्रश्न ऑनलाइन पद्धतीने सोडवले जाते.

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती

जात प्रमाणपत्राची आवश्यकता ( Requirement of caste certificate )

आज कालच्या युगामध्ये दहावी झाल्यानंतर अकरावी आणि बारावीला प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप साठी जातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
कोणत्याही योजनांचे लाभ घेण्यासाठी त्या योजनेमधील जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रत्येक आरक्षणाच्या ठिकाणी तुम्ही जातीच्या प्रमाणपत्राचा उपयोग करून योग्य ते फायदा घेऊ शकता.
महाराष्ट्र राज्यामध्ये नोकऱ्या असो किंवा योजना यामध्ये आरक्षण असते त्या आरक्षणाचा उपयोग करून जातीचे प्रमाणपत्र लावून तुम्ही त्या योजना किंवा नोकऱ्या प्राप्त करू शकता किंवा लाभ घेऊ शकता.
अशी अनेक उदाहरणे आहेत, जातीचे प्रमाणपत्र वापरून योग्य ते लाभ किंवा सवलत घेऊ शकता. परंतु यासाठी तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.

Download Nirgam Utara in marathi pdf

जात प्रमाणपत्राचे फायदे ( Caste Certificate Benefits )

  • महाराष्ट्र राज्यामध्ये आपण एक विशिष्ट वर्गामध्ये आहे असा एक प्रमाणपत्र असतो.
  • ज्याचा उपयोग करून नागरिकांचे वर्ग सिद्ध करण्यासाठी मदत होतो.
  • महाराष्ट्र राज्यातील अनेक योजनांचे लाभ घेता येते.
  • एवढेच नव्हे तर शाळेत आणि कॉलेजमध्ये प्रवेश तथा कॉलेज फीस मध्ये सवलत दिली जाते.
  • परंतु यासाठी विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते.
  • संबंधित आरक्षणाच्या ठिकाणी त्याच्या जातीच्या प्रमाणपत्राचा उपयोग करून त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो.
  • आरक्षणामध्ये तर कोणतेही लाभ घेता येतो त्याचबरोबर सर्वसामान्यांमध्ये सुद्धा लाभ घेता येते.
  • सरकारच्या योजना असो किंवा शैक्षणिक विभागांमध्ये विविध वर्गाला ठरवलेल्या आरक्षणा नुसार त्याचा लाभ अवश्य होते.
  • जात प्रमाणपत्रासाठी अर्ज

जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रोसेस ( Caste Certificate Online Application Process )

  1. सर्वप्रथम तुम्हाला aaplesarkar.mahaonline.gov.in या संख्येत स्थळावरती जायचं आहे.
  2. नवीन युजर नोंदणी करून घ्यायचा आहे.
  3. लॉगिन करून घ्यायचं आहे.
  4. डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र शोधायचे आहे.
  5. जातीच्या प्रमाणपत्रासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते सेव करून ठेवायचे आहेत.
  6. संपूर्ण अर्ज भरून घ्यायचे आहे, ज्यामध्ये अर्जदाराचे तपशील आणि लाभार्थ्यांचे तपशील संपूर्ण भरून घ्यायचा आहे.
  7. ज्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहात त्यासंबंधीत संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत.
  8. त्यानंतर तुम्हाला संबंधित जातीचे प्रमाणपत्राचे शुल्क भरून घ्यायचे आहे.
  9. अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार या पोर्टलवरून अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयास भेट देण्याची आवश्यकता सुद्धा राहणार नाही.
  10. यामध्ये काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता.
  11. तसेच खाली दिलेल्या व्हिडिओ पाहून सुद्धा घरी बसून स्वतः जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.

जातीच्या प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे ( Caste Certificate Required Documents List )

इतर मागासवर्ग / विशेष मागासवर्ग / अनुसूचित जाती-जमाती ( OBC / SBC / SC / ST / VJNT )

  1. ओळखीचा पुरावाआधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, जॉब कार्ड, वाहन चालक परवाना किंवा कोणतेही शासकीय ओळखपत्र किंवा निमशासकीय ओळखपत्र. (कोणताही एक)
  2. पत्त्याचा पुरावा आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, घर कर भाडेपावती, सातबारा (7/12) किंवा आठ अ (8A) चा उतारा, विज बिल, मालमत्ता कर पावती, राशन कार्ड. (कोणताही एक)
  3. अर्जदाराचा फोटो
  4. जातीच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक शपथपत्रे
  5. खासरा पाणी (क पत्रक) 1958 चा पुरावा म्हणून वापरला जातो.
  6. वंशावळी शपथ पत्र.
  7. सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेला जातीचा पुरावा व रहिवासी प्रमाणपत्र
  8. लाभार्थ्याचे आवश्यक कागदपत्रे
    • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालक परवाना)
    • रहिवाशी पुरावा (राशन कार्ड)
    • निर्गम उतारा
    • शाळा सोडल्याचा दाखला (टि सी)
      • प्राथमिक शाळेचा पुरावा (निर्गम / टी सी )
      • माध्यमिक शाळेचा दाखला (निर्गम / टी सी )
      • उच्चमाध्यमिक शाळेचा दाखला (निर्गम / टी सी )
    • बोनाफाईड
    • लाभार्थ्याचे जन्म नोंदवही चा उतारा (असल्यास )
  9. वडिलांचे आवश्यक कागदपत्रे
    • आधार कार्ड
    • निर्गम (असल्यास )
    • शाळा सोडल्याचा दाखला (असल्यास )
    • जातीचे प्रमाणपत्र (असल्यास )
    • रहिवाशी पुरावा (असल्यास )
  10. नातेवाईकातील लागणारे कागदपत्र
    • जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
    • नातेवाईकातील जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
    • आधार कार्ड.
    • निर्गम उतारा / शाळा सोडल्याचा दाखला (TC).
    • नातेवाईकातील जन्म नोंदवही उतारा (असल्यास)
  11. विवाहित महिलांसाठी
    • विवाहपूर्वीचा जातीचा पुरावा
    • विवाह नोंदणी प्रमाणपत्र

वरील सर्व कागदपत्रे आवश्यक त्या साईज मध्ये स्कॅन करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाइन पद्धतीने स्वतः अर्ज करण्यासाठी काही अडचण येत असतील तर खाली दिलेला विडियो पाहून सहज रित्या घर बसल्या अर्ज करू शकता.

वरील माहिती मध्ये काही अडचण असतील तर तेलीग्राम चॅनल मध्ये जॉइन होवून कमेन्ट करून विचारू शकता अशाच नव-नवीन माहिती साठी फोलो करा.

धन्यवाद

> जात वैधता साठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती

> Download Birth,Marriage etc Certificates pdf in Marathi

> PAN Aadhar Link Process

> Download Nirgam Utara in marathi pdf

15 thoughts on “<strong>Caste Certificate Maharashtra | Application Process | Documents Required | जात प्रमाणपत्र कागदपत्राची यादी व संपूर्ण माहिती</strong>”

Leave a Comment