BSNL Recharge Plan In Maharashtra

BSNL Recharge Plans

BSNL – भारतातील सर्वात स्वस्त टेलिकॉम सेवा आणि सरकारी दूरसंचार कंपनी म्हणजेच बीएसएनएल आहे. बीएसएनएल प्लॅन च्या किमती स्वस्त आहेत. ज्यामुळे कमी किमतीमध्ये नागरिकांना अधिक लाभ मिळविता येते.
सर्वप्रथम देशामध्ये बीएसएनएल द्वारे 4 G नेटवर्क विस्तार करून त्यानंतर 5 G
नेटवर्क सेवा सुरू करण्यात येतील अशी घोषणा झाली आहे.
ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी असून एकदम स्वस्त मध्ये ग्राहकांना लाभ देण्याचा ठरविले आहे.

बीएसएनएल BSNL ची 5G चा प्लॅन लवकरच सुरू होणार असल्यामुळे ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. हे कारण म्हणजे खाजगी टेलिफोन कंपन्या त्यांच्या प्लॅन्सच्या किमती वाढवून ठेवले असून सर्वसाधारण नागरिकांना हे परवडणारे दिसत नाही. मागील काही महिन्यांमध्येच मोठ्या प्रमाणात बीएसएनएल (BSNL) युजर देखील वाढलेले दिसत आहे.

सर्वात स्वस्त सेवा देणारी ही भारताची कंपनी असून स्वस्त प्लॅन्स प्रस्तुत केल्यामुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसत आहे.

खाजगी कंपन्यांचे ग्राहक आपले सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करत आहेत. मोठ्या संख्येने ग्राहक bsnl कडे वळले आहेत. ग्राहकांचा वळण्यामध्ये सरकारी कंपनी म्हणजेच बीएसएनएलचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, ब्रॉडबँड आणि वायफाय सेवा या स्वस्त असून महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर

खाजगी टेलिकॉम कंपन्या आपल्या सेवा महा ग केल्यामुळे युजर्स बीएसएनएल कडे फोर्ट केले आहे. परंतु युजर्स कंट्रोल करण्याकरिता जिओ एअरटेल आणि वडाफोन आयडिया या कंपन्या आपल्या सेवांचे दर कमी करण्याच्या दिशेने आहेत. जर बीएसएनएल टेलिफोन स्पर्धेत टिकून राहिली तर खाजगी कंपन्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे शक्यता आहे.

सध्या बीएसएनएल ची सेवा सर्वात स्वस्त असून हे एक सरकारी टेलिकॉम कंपनी असून भविष्यात कोणतेही दरवाढ करण्याचा विचार देखील करणार नसल्याचे ग्राहकांचे विचार आहेत. परंतु सध्या तरी बीएसएनएल सेवा कमी आणि खाजगी कंपन्यांचे अधिक असल्याचे दिसत आहे. स्वस्त विचार मिळत असल्याने बीएसएनएल कडे ग्राहकांचा ओढा वाढला तर बीएसएनएलला स्पर्धेत टिकून राहण्याकरिता खाजगी कंपन्यांची रिचार्ज प्लॅन स्वस्थ करण्याची पाळी येणार असल्याचे टेलिकॉम क्षेत्रातील विशेषज्ञ म्हणत आहे.

BSNL चे 5G सेवेसाठी चाचणी

येत्या काही दिवसांमध्येच बीएसएनएल संपूर्ण देशामध्ये त्यात ग्रामीण व शहरी भागात फोरजी4G सेवा विस्तार करण्याचे विचार करत आहे. येत्या काही दिवसातच देशभरात दहा लाख नवीन बीएसएनएल टॉवर्स उभारण्याचे काम चालू आहे त्याचबरोबर 5G नेटवर्क सेवा देण्याचे देखील तयारी चालू आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये बीएसएनएल नेटवर्क मजबूत करून ठेवण्याकरिता आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिक तसेच उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापर करण्याचे लक्ष केंद्रित करत आहेत असे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे.

सध्याचा बीएसएनएल टेलिफोन क्षेत्रातील हिस्सा हे 8% पेक्षाही जास्त असल्याचे दिसत आहे आणि ही वाढ जर सुरळीत चालत राहिली तर अपेक्षा आहेत की बीएसएनएल व्यवस्थापन यापेक्षा जास्त गतीने काम करतील.

Leave a Comment