आधार कार्ड हरवलं आणि आधार कार्ड नंबर सुद्धा माहिती नाही असे काढा घरबसल्या आधार कार्ड..?

Aadhar Card Updates

आधार कार्ड हा एक आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट असून आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून त्याला वापरला जातो. त्याशिवाय आधार कार्ड तुम्ही तुमच्या राशन कार्ड पॅन कार्ड तसेच इतर कागदपत्रांसोबत कोणत्याही शाखेतील बँक अकाउंट ओपन करू शकता. तसेच लिंक देखील करू शकता आधार कार्ड बँकेला लिंक करणे अनिवार्य झालेले आहेत. तर हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणून वापरण्यात येत आहे. सध्याच्या काळात आधार कार्ड शिवाय राहणं अशक्य आहे.
Uidai ने सेल्फ सर्विस पोर्टल हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील आहे याद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्ड किंवा आधार क्रमांक जरी हरवले किंवा विसरले असतील तरी काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाहीये तर या पोर्टलवरून तुम्ही घरबसल्या आधार क्रमांक व तसेच आधार कार्ड तुम्ही डाऊनलोड करून वापरू शकता. आता तुमचा आधार कार्ड किंवा आधार क्रमांक पुन्हा मिळवण्यासाठी तुम्हाला युआयडीएआयच्या पोर्टल वरती जाऊन पुन्हा प्राप्त करू शकता. पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही आधार कार्ड नवीन काढता तेव्हा तुमचा ईमेल आयडी व तसेच मोबाईल क्रमांक जोडला जातो. या जोडलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी च्या मदतीने तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून अगदी सहजरीत्या आधार क्रमांक व आधार कार्ड प्राप्त करू शकता.

Follow Below Steps For Get Aadhar Card Details

  1. सर्वप्रथम तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे, जर तुमच्याकडे आधार क्रमांक असेल तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचे असतील तर आधार क्रमांक किंवा एनरोलमेंट नंबर हा पर्याय निवडायचा आहे.
  2. आधार क्रमांक नसेल तर तुम्हाला फॉरगेट आधार नंबर or रिट्रीव आधार नंबर पर्यावरण क्लिक करून तुमचे नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा डेट ऑफ बर्थ सगळे डिटेल्स टाकून समोर जायचं आहे.
  3. त्यानंतर सेंड OTP या बटणावर क्लिक करून OTP सेंड करायची आहे तुमच्या रजिस्टर ईमेल किंवा मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी टाकून लॉगिन करायचा आहे.
  4. लॉगिन केल्यानंतर तुम्ही आधार कार्ड किंवा आधार नंबर तुमच्या मोबाईल तसेच ईमेल वरती प्राप्त करू शकता.
  5. जरी आधार कार्ड प्राप्त करण्यासाठी किंवा आधार क्रमांक प्राप्त करण्यासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही 18001801947 टोल फ्री किंवा 011-1947 स्थानिक नंबर वरती कॉल करून योग्य ती माहिती प्राप्त करू शकता.