Farmer Id Card : शेतकरी ओळखपत्र काढल का ? अशी करा नोंदणी, संपूर्ण माहिती

शेतकरी ओळखपत्र

शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड होय ही योजना केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सहाय्याने शेतकरी सरकारकडून येणाऱ्या अनेक योजनांचे लाभ डायरेक्ट घेऊ शकतो म्हणजेच सन्मान निधी योजना आणि किसान क्रेडिट कार्ड व तसेच शेतकऱ्याला जे काही लोन हवा आहे म्हणजेच कर्ज, ते देखील या कार्डच्या सहाय्याने भेटू शकते शेतकरी ओळखपत्र हे सध्याच्या या युगामध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्ड देखील बनणार आहे.

देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बनवणे हे शेतकऱ्यास अनिवार्य आहे.

Farmer Id Card Registration

शेतकरी ओळखपत्र तयार करण्याकरिता योग्यता | Farmer id card Eligibility
  1. शेतकऱ्याच्या नावाने शेत जमीन असणे आवश्यक
  2. शेतकरी हा भारताचा असावा
  3. शेतकऱ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे
  4. आधार कार्ड ला बँक लिंक असणे आवश्यक आहे
  5. शेत जमिनीचे संपूर्ण तपशील माहिती असणे आवश्यक आहे
  6. शेत जमिनीचे तपशील जसे की सातबारा, आठ अ असणे आवश्यक

Farmer id card Benefits | शेतकरी ओळखपत्र फायदे
  • शासनाचे योजना डायरेक्ट लाभ घेता येईल शेतकरी साठी शेतकरी ओळखपत्र म्हणून कार्ड दिला जाईल
  • कोणत्याही योजना सहज या कार्डद्वारे भेटतील
  • शेतकरी आहात म्हणून मान्यता मिळेल
  • तुमच्या नावाने एकूण किती शेतजमीन आहे ते देखील यामध्ये दिसेल
  • शेतकरी ओळखपत्र हे आधार कार्ड ला सलग्न राहील
  • शासनाकडून येणाऱ्या रक्कम किंवा योजना डायरेक्ट या कार्डद्वारे अकाउंट मध्ये प्राप्त होतील
  • शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र म्हणून तयार होईल ज्या ओळखपत्रांमध्ये शेतकऱ्याचे संपूर्ण माहिती राहील.
  • असे अनेक फायदे आहेत जे यामध्ये आणखीन अपडेट येत राहतील.

केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार

शेतकरी ओळखपत्र नोंदणी | Farmer Id Card Registration
  1. सर्वप्रथम Agri Stack या संकेतस्थळावरती जायचं आहे
  2. यामध्ये तुम्हाला साइन अप या बटन वरती क्लिक करून सर्वप्रथम नोंदणी करून घ्यायचा आहे.
  3. नोंदणी करून झाल्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचा आहे.
  4. त्यानंतर शेतकऱ्याची संपूर्ण तपशील भरायचा आहे.
  5. त्यानंतर संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट करायचा आहे.
    सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म समोरील अधिकारी तपासणी करेल आणि अप्रोड केल्यानंतर तुम्ही शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड करू शकता
  6. अशा पद्धतीने तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवू शकता.

शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड | Farmer Id Card Download
  • शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड करण्याकरिता ज्या मोबाईल ने तुम्ही लॉगिन केलात त्याच मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचा आहे.
  • जर तुमचा फॉर्म Approved झाला असेल, तर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड चा ऑप्शन दिला जाईल.
  • त्यावर ती क्लिक करून तुम्ही शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड करू शकता.

शेतकरी ओळखपत्र बनवण्याकरिता तुम्ही जवळच्या CSC सेंटरला देखील भेट देऊ शकता किंवा मी सांगितलेल्या प्रोसेसने देखील तुम्ही शेतकरी ओळखपत्र स्वतः तुमच्या मोबाईल मध्ये देखील काढू शकता.

Leave a Comment