केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार फार्मर आयडी कार्ड – Farmer Id Card

फार्मर आयडी कार्ड


Farmer Id Card – शेतकरी फार्मर आयडी कार्डद्वारे मिळणार किसान सन्माननिधी आणि किसान क्रेडिट कार्ड तसेच पीकासाठी लागणारा खरेदी विक्री सारख्या सुविधेचा लाभ घेता येईल.

देशात शेतकऱ्यांना किसान आयडी कार्डद्वारे डिजिटल कृषी मिशन अंतर्गत केंद्र सरकारने ही योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे जवळपास 11 कोटी शेतकऱ्यास डिजिटल फार्मर आयडी कार्ड दिला जाईल. या एकाच कार्डवर शेतकरी किसान क्रेडिट कार्ड आणि शेतकरी सन्मान योजना व तसेच पिकांसाठी लागणाऱ्या खरेदी-विक्रीच्या सुविधा देखील लाभ घेऊ शकतात.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने नोव्हेंबर 28 रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवले व शेतकरी ओळखपत्र तयार करण्याकरिता विशेष शिबिर देखील आयोजित करण्याचे निर्देशन दिले आहे.

फार्मर आयडी कार्ड

फार्मर आयडी कार्ड हे एक ओळखपत्र असून हे आधारशी लिंक केलेले राहील. ज्यामध्ये शेतकऱ्याला किती जमीन आहे अशी नोंदणीची जोडले जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहिती सोबतच कोणत्या पिकाची पेरणी केली आहे आणि त्या पिकाचे तपशील देखील नोंदविला जाईल. या कार्डमुळे शेतकऱ्यांना योग्य हमीभाव योजनेसाठी अर्ज करते वेळेस आवश्यक असलेल्या तपासण्या देखील सुलभ होतील.

शेतकरी ओळखपत्र रजिस्ट्रेशन

कृषी मंत्रालयाने फार्मर आयडी कार्डच्या नोंदणी करण्यासाठी संकेत स्थळ तयार केला आहे. केंद्र सरकारच्या या डिजिटल कृषी मिशनच्या योजनेअंतर्गत फार्मर आयडी कार्ड तयार करण्यासाठी ‘ॲग्री स्टॅक’ चा वापर केला जाईल.

कृषी मंत्रालयाने ओळखपत्र तयार करण्याकरिता जास्तीत जास्त शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशित देखील दिले आहे. प्रत्येक शिबिर साठी 15000 रुपये अनुदान म्हणून आणि तसेच एका फार्मर आयडी कार्ड साठी 10 रुपये अनुदान म्हणून प्रोत्साहन करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली आहे.

कोणत्या राज्यात शेतकरी ओळखपत्र बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड तयार करण्याचे काम अतिशय वेगाने सुरू झाले. इतर राज्यातही हे काम वेगवेगळ्या शिबिरे अंतर्गत चालू झाले.

Leave a Comment