महावितरणाचे 15 डिसेंबर पासून होणार नवीन नियम लागू

महावितरण नवीन नियम

Mahavitaran – महावितरण कंपनी महाराष्ट्र राज्यामध्ये वीजपुरवठा करण्याचे काम करते. ग्राहकांच्या अनेक सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आज उचलले आहे. सध्याच्या या डिजिटल युगामध्ये विजेचे महत्व अधिक आहे. या युगामध्ये वीज बिल भरण्याच्या प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नवीन बदल करण्यामध्ये सरकारी आणि तसेच खाजगी कंपन्यांना वीज बिलाचे व्यवस्थापन करण्यास अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे.

महावितरणाचे वीज बिल भरण्यास नवीन सुलभ प्रक्रिया ग्राहकांना करून दिले आहे यामुळे ग्राहकांना विविध सवलतीनुसार विज बिल भरू शकतात.
सध्याच्या या परिस्थितीमध्ये राज्यातील सरकारी कार्यालय आणि खाजगी कंपन्या यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे.

त्यांच्याकडे असलेल्या वीज कनेक्शनचे बिल विरुद्ध म्हणजे वेगवेगळ्या तारखेला भरावे लागते. ज्या वेगवेगळ्या तारखेमुळे बिल भरण्यात गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे ग्राहक वीजबिल न भरल्यामुळे थकबाकी चा दंड भरावा लागतो. अनेक प्रसंगी वीज कनेक्शन देखील तोडण्यात येत आहे.

याच समस्यावर मात करण्याकरिता महावितरणाने एक अधिकृत ऑनलाइन वेबसाईट किंवा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या नवीन प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने त्यांच्या मुख्यालयातून म्हणजेच सरकारी कार्यालय किंवा खाजगी कार्यालय यांच्या मुख्यालयातून राज्यातील सर्व वीज कनेक्शनची बिले या एकाच प्लॅटफॉर्मवरून भरू शकतात. या नवीन प्लॅटफॉर्म सुरू होण्याच्या व्यवस्थेमुळे विज बिल भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आणि विज बिल थकीत राहण्याची शक्यता कमी देखील होणार असल्याची माहिती आढळून येत आहे.

महावितरणाचे ग्राहकांना मिळणारे सवलती

योग्य वेळेत बिल भरल्यास एक टक्का सवलत
इलेक्ट्रॉनिक्स बिल स्वीकारल्यास प्रत्येक बिल मागे दहा रुपयाची सवलत
डिजिटल पेमेंट केल्यास पाचशे रुपये पर्यंत सवलत दिली जाईल.

या अशा अनेक महावितरणाच्या सवलतीच्या लाभ घेण्याकरिता ग्राहकांना महावितरण करून नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन नोंदणी करून ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेऊ शकतात आणि मार्गदर्शना करिता महावितरणाच्या कार्यालयात संपर्क करावे.

Leave a Comment