शेळी व मेंढी पालन योजना विषयी संपूर्ण माहिती | शेळी पालन कर्ज

नमस्कार शेतकरी बांधवांनो,
महाराष्ट्र शासनाकडून शेळीपालन करण्याकरिता शेळी पालन योजना अंतर्गत नागरिकांना 10 ते 50 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे.

शेळी पालन

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी किंवा व्यक्ती जर स्वतःचा शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी हे खास योजना ठरणार आहे. या योजनेद्वारे नागरिक कमी व्याजदरावर पैसे घेऊन शेळी पालन किंवा मेंढी पालन चा व्यवसाय सुरू करू शकतो.
महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी शेळी किंवा मेंढी पालन हा एक पारंपारिक व्यवसाय आहे. परंतु काही आर्थिक परिस्थितीमुळे शेळी किंवा मेंढी खरेदी करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही, त्यांना या योजनेअंतर्गत एक विशिष्ट रक्कम दिले जाते. ज्याच्या सहाय्याने तो शेळीपालन सुरू करू शकतो.

योजनेचे नावशेळी व मेंढी पालन योजना
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी व अन्य नागरिक
उद्देश पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहन देणे
लाभ 10 ते 50 लाख
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन किंवा ऑनलाईन
शेळी व मेंढी पालन योजना पात्रता

महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5000/-

योजनेचे अटी आणि शर्ती
  1. अर्जदाराची किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.
  2. अर्जदाराकडे चारा उगवण्यासाठी जमीन असणे आवश्यक.
  3. लाभार्थ्याची निवड करताना महिलेस 30% आणि दिव्यांगा करिता 3% आरक्षण देतील.
  4. लाभार्थ्याच्या आधार कार्ड ला बँक अकाउंट सलग्न असणे.
  5. लाभार्थ्याचे कुटुंब सदस्य किंवा स्वतः शासकीय निमशासकीय किंवा लोकप्रतिनिधी नसावा.
  6. एका कुटुंबात एकाच सदस्याला लाभ घेता येईल.
  7. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक.
  8. लाभार्थी अनुसूचित जाती जमाती जातीचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  9. लाभार्थी निवड झाल्यानंतर 10% रक्कम भरावे लागणार.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

शेळी व मेंढी पालन योजना आवश्यक कागदपत्रे
  1. लाभार्थ्याचे आधार कार्ड
  2. राशन कार्ड
  3. बँक पासबुक
  4. रहिवाशी दाखला
  5. मोबाईल नंबर
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. जातीचा दाखला आवश्यक असल्यास
  8. जमिनीचा सातबारा
  9. पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास
  10. उत्पन्न दाखला
  11. अर्जदार दिव्यांग असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र
  12. हमीपत्र व तसेच बंधनपत्र लागतील.

महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

शेळीपालन योजने करिता ऑनलाईन अर्ज
  • सर्वप्रथम MAHAMESH या संख्येत स्थळावरती जावे लागेल.
  • त्यानंतर शेळी पालन योजना या अर्जावरती क्लिक करावे.
  • नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करून संपूर्ण माहिती भरून कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • त्यानंतर संपूर्ण भरलेला फॉर्म सबमिट करायचं आहे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती पाठविला जातो.

शेळी पालन योजनेचे काही संकेतस्थळ

ऑनलाइन अर्ज करण्याचे काही संकेतस्थळ जे की खाली दिलेल्या प्रमाणे आहेत. ज्याच्या सहाय्याने तुम्ही त्या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या त्या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणू शकता. आणि योग्य त्या योजनेचा लाभ घेऊ शकता

शेळी व मेंढी पालन योजनासंकेतस्थळ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी पालन विकास महामंडळView
AH-MAHABMSAH MAHABMS
शेळीपालन योजने पंचायत समिती अर्जDownload
शासन निर्णयView
NML Udyamimitra PortalView

Leave a Comment