लेक लाडकी योजना माहिती, अर्ज, कागदपत्रे व पात्रता

लेक लाडकी योजना


ही योजना महाराष्ट्रामध्ये नवीन सुरू करण्यात आली आहे या संदर्भातील शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर भेट देऊन बघू शकता.
लेक लाडकी योजना नेमकं काय आहे? त्याची संपूर्ण माहिती अर्ज कशा प्रकारे करावा ? त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ? याची संपूर्ण माहिती आपण या एका पोस्टमध्ये बघणार आहोत.

हे वाचा – सरपंच किंवा उपसरपंच अविश्वास ठराव

लेक लाडकी योजना माहिती

2023 च्या अर्थसंकल्प मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये लेक लाडकी योजनेची सुरुवात केली असून, ही योजना मुलीच्या शिक्षणाच्या पुढील वाटचालीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव म्हणजेच लेक लाडकी योजना होय.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गरीब पात्र मुलींना 75 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक वाटचालीसाठी आर्थिक सहाय्यता केली जाते. ही योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता किंवा ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता. या योजनेमध्ये मुलीच्या 18 वर्षापर्यंत आर्थिक सहायता केली जाते.

लेक लाडकी योजनेचे आर्थिक मदत अनुक्रमे
  • लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून मुलींना जन्मानंतर 5000 रुपये आर्थिक सहायता करण्यात येतील.
  • मुलगी मोठी झाल्यास इयत्ता पहिली मध्ये शिक्षणासाठी 5000 हजार रुपये दिले जाते.
  • इयत्ता सहावी मध्ये मुलीला 6000 हजार रुपये आर्थिक सहायता केली जाते.
  • मुलीच्या अकरावी मध्ये प्रवेश घेताना 8000 हजार रुपये दिले जाते.
  • लाभार्थी किंवा मुलीच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी 75000 रुपये देण्यात येते.
  • अशा प्रकारे या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या पुढील शिक्षणासाठी योग्य ती रक्कम ठरवलेल्या कालावधीनुसार दिले जाते.

हे वाचा – कमी पैशात सुरू करा नवीन बिजनेस | नंतर होईल लाखोंची कमाई

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.
  • लाभार्थ्याचे राशन कार्ड पिवळ्या किंवा केसरी कलरचा असावा.
  • गरीब किंवा दुर्बल घटकातील मुलींनाच ह्या योजनेचे लाभ मिळविता येईल.
  • मुलीच्या पुढील शिक्षणासाठी शासनाकडून 75000 रुपये, लाभार्थीच्या 18 वर्षानंतर मिळवायचे असतील तर शैक्षणिक सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

हे वाचा – प्रधानमंत्री सूर्योदय योजना फ्री (Free) वीज

लेक लाडकी योजनेस लागणारे कागदपत्रे
  • लाभार्थी किंवा मुलीचा आधार कार्ड
  • जन्माचा दाखला
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे
  • कुटुंबाचे राशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसे करावे

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकास किंवा वर्गशिक्षकास संपर्क करा.
ही योजना ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता.

>>महिलांना मिळणार दरमहा 3000 रुपये पोस्ट ऑफिस ची नवीन योजना

>>ग्रामसेवक / ग्रामपंचायत ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र pdf

>>मृत्यू नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र pdf डाउनलोड

>>ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार

Leave a Comment