ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे
आपल्या महाराष्ट्रात तील गावात स्थानिक स्वराज्य संस्था राबत असते म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गावच्या लोकसंख्येवरून सदस्य ठरवली जाते. गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंच यांची निवड केली जाते त्यासोबतच उपसरपंच व इतर सदस्यांची ही निवड केली जाते.
सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य व्हायचे असतील तर आपल्याला निवडणुकीच्या वेळी अर्ज करावा लागतो व दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक लावली जाते. ज्यामध्ये आपला अर्ज करून त्या निवडणुकीमध्ये सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून नेमणूक केली जाते.
सरपंच हा गावातील प्रथम नागरिक त्या गावाचे अध्यक्ष म्हणून गावाचा कारभार पाहत असतो त्याच्या मदतीस ग्रामसेवक व ग्रामपंचायत मध्ये इतर सदस्य व शिपाई यांचा सहभाग असतो.
ग्रामपंचायत पदासाठी निवडणूक लढविण्याची पात्रता काय आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात व तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
परंतु निवडणुकीला लढविण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात.? त्याचबरोबर त्याची पात्रता काय राहणार आहे.? ह्या सर्व गोष्टी या एका पोस्टमध्ये बघणार आहोत.
हे वाचा – जातीचा दाखला कसा काढायचा
ग्रामपंचायत निवडणूक ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया
- सर्वप्रथम GrampanchayatForms/Registration या संकेतस्थळावर जावे.
- या संकेतस्थळावर सूचनेनुसार वैयक्तिक माहिती, विभाग, जिल्हा, तालुका व तसेच ग्रामपंचायत याची निवडणूक करून नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर निघालेला पूर्ण प्रिंट आऊट त्यावर उमेदवाराची स्वाक्षरी घेऊन,
- निवडणूक अधिकाऱ्याकडे ठरवलेल्या वेळेत कागदपत्रासह दाखल करावे.
या पोस्टमध्ये आपण ग्रामपंचायत साठी सरपंचाची निवडणूक कशी केली जाते त्यासाठी पात्रता काय आहे ? कोण कोणते डॉक्युमेंट लागतात ? व तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ? हे आपण बघितलं आहोत. याच्यासंबंधी काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता.
ग्रामपंचायत निवडणुक पात्रता
- भारताचा रहिवासी असावा
- वय मर्यादा 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक
- निवडलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान यादी मध्ये नाव नोंदविलेले असावे.
- कोणत्याही प्रकारचे ग्रामपंचायत घर तकबाकी नसावा.
- तो व्यक्ती कोणत्याही शासकीय कर्मचारी नसावा.
- त्याला अपत्य दोन पेक्षा जास्त असू नये.
- उमेदवार किमान सातवी पास असणे आवश्यक.
हे वाचा – जात वैधता प्रमाणपत्र कसे काढायचे
ग्रामपंचायत निवडणूक साठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
- निवडणूक अर्ज
- मतदान यादीतील उमेदवाराचे नाव त्या पानाची झेरॉक्स.
- ठरवलेली अनामत रक्कम
- आधार कार्ड
- दोनच अपत्य असल्याचे स्वयंघोषणापत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणीसाठी सादर केलेली पावती.
- निवडणूक झाल्यानंतर 12 महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची हमीपत्र.
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम / टीसी
- शौचालय असल्याबाबतचे शपथपत्र घोषणापत्र
- मालमत्ता व दायित्व असल्याचे स्वयंघोषणा म्हणजेच आपल्या नावावरील असलेली मालमत्ता किंवा प्रॉपर्टी
- कॅरेक्टर सर्टिफिकेट
- गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- मतदान कार्डनवीन खाते काढलेले बँकेचे पासबुक
- ठेकेदार नसल्याचे स्वयंघोषणापत्र
- कोणत्याही प्रकारचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो