आजच्या पोस्ट मधील हेच सर्वात महत्त्वाची लेख आता सुकन्या समृद्धी योजना यामध्ये मिळणार 7.6% व्याजदर.
सुकन्या समृद्धी योजना :-
असे कित्येक योजना आपल्या भारत देशात राबवले जातात परंतु मुलींच्या भविष्यासाठी व इतर मुलींच्या शिक्षणासाठी ही योजना आहे, या योजनेमध्ये {एप्रिल जुलै 2021} मध्ये 7.6% व्याजदर देते, ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी व मुलींच्या प्रगतीला प्रोत्साहन करण्यासाठी भारत सरकार पाठीशी असलेली एक बचत योजना आहे, ह्या योजनेमुळे मुलींच्या भविष्यासाठी लागणारी निधी निर्माण करण्यास प्रोत्साहित करते, ही योजना (सुकन्या समृद्धी योजना) कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये उघडले जाते.
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ 7.6% व्याजदर :-
ह्या योजनेमध्ये मुलींचा जन्म किंवा तिचे वय दहा वर्ष कम्प्लीट होईपर्यंत हे खाते पालक कधीही काढू शकतात. खाते काढताना सुरुवातीस किमान 250 रुपये जमा करावे लागतील व त्यानंतर 100 रुपये च्या पटीने जमा करावी लागते. किमान 250 रुपये ते कमाल मर्यादा 150000 हजार रुपये आहे. हे खाते काढताना प्रत्येक मुलीसाठी एक खाते काढण्याची परवानगी आहे, जास्तीत जास्त दोन खाते काढता येतात.
मुलीच्या 10 वर्षानंतर ते खाते चालू शकते,
उच्च शिक्षण किंवा इतर उद्देशाने मुलीच्या 18 वर्षानंतर 50% पैसे काढण्याची परवानगी दिली जाते व
खाते उघडल्यापासून ते 21 वर्षाच्या कालावधीनंतर मॅच्युरिटी होते,
खाते उघडल्यापासून ते 15 वर्षे रक्कम जमा करावी लागते,
त्यानंतर त्या पैशावरती व्याजदर मिळणे चालू राहील,
जर काही कारणांमुळे काही कालावधीनंतर खाते बंद झाले असेल किंवा केले असतील तर त्यावर व्याजदर मिळणार नाही,
जर मुलीचं वय 18 पेक्षा जास्त असेल व तसेच तिचे लग्न पण झाले असेल तर बंद करण्याची अनुमती आहे.
GST साठी लागणारे कागदपत्र व संपर्ण मार्गदर्शन
महत्त्वाची सूचना :-
फक्त मुलींचे कायदेशीर पालकच खाते काढू शकतात.
खाते जास्तीत जास्त दोन काढण्याची परवानगी आहे.
पालक भारताचे नागरिक किंवा रहिवासी असावा लागतो.
पेंशन च्या माहितीसाठी येथे क्लिक करा
पात्रता :-
सुकन्या समृद्धी योजनेचे लाभ फक्त मुलीच घेऊ शकतात.
यामध्ये मुलींचे कमाल मर्यादा 10 वर्ष असावे.
माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना पण शेअर तसेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा.