सरपंच
सरपंच कर्तव्य आणि अधिकार हे ग्रामपंचायतीतील लोकसेवक या उद्देशाने गावातील होणाऱ्या कामाची जबाबदारी पार पाडाव्या लागतात. गावाला योग्य स्थानी व विकासाच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी हे सरपंच व त्यांच्यातील इतर सदस्यांची असते. सरपंच हा गावातील प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो.
गाव विकासाची जबाबदारी सरपंचाचे प्रथम कर्तव्य शासनाने सोपविला आहे व तसेच त्यांनी लोकसेवक म्हणून स्वीकार सुद्धा केली आहे तर सरपंचाचे कर्तव्य गावाचा विकास करणे हा मुख्य असते.
कलम 38 च्या नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत संबंधी माहिती दिली आहे. यामध्ये सरपंचाचे संपूर्ण काम व जबाबदारी सांगितले आहे.
हे पहा – जन्म दाखला मोबाईलवर असे काढा
सरपंचाचे कर्तव्य आणि अधिकार
- ग्रामपंचायत सभा बोलावणे आणि अध्यक्ष स्थान भूषविणे.
- ग्रामसभा झालेल्या ठरावांची योग्य ती अंमलबजावणी करणे.
- ग्रामपंचायत मालमत्तेचे संरक्षण करणे.
- गावातील होणाऱ्या विविध तंटे सोडवणे,पाणीपुरवठा, शिक्षण आणि स्वच्छता अशा अनेक कार्यक्रम अध्यक्ष या नात्याने पार पाडणे.
- सरकारकडून येणाऱ्या विविध योजनेचे अंमलबजावणी करणे.
- गावाचा विकास आराखडा वार्षिक नुसार अंदाजपत्रक बनवणे.
- ग्रामपंचायत मध्ये नेमणूक झालेल्या कर्मचारीला निलंबित किंवा बडतर्फ करण्याचे अधिकार सरपंच करतात.
- शिक्षण व्यवस्थेवर देखरेख करणे.
- शासनाच्या निर्देशाखाली असलेले आवश्यक प्रमाणपत्रे आणि गावातील लोकांना आवश्यक प्रमाणपत्रावर सही व शिक्का देणे.
- शासकीय योजनांचे आर्थिक नियोजन.
- शासकीय योजनांचे लाभ योग्य त्या व्यक्तीला मिळवून देणे.
- ग्रामपंचायत मधील नोंदवया आणि अभिलेख यांची सुव्यवस्थित देखरेख करणे.
- निराधार, विधवा, अपंग व्यक्तींना योग्य ती योजनांचे लाभ मिळवून देणे.
- गावातील सर्व नागरिकांना सकारात्मक दृष्टी व समान दृष्टिकोन ठेवून सहकार्य करावे.
- ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी वर्गावर नियंत्रण व देखरेख ठेवणे.
- ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना व तसेच सदस्यांना बत्ता मंजूर करणे.
हे वाचा – ग्रामसेवकांचे कर्तव्य आणि काम
ग्रामपंचायत मधील सर्व कामांचे जबाबदारी ही गावाचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच यांचे असते करावयाचे कामे आहेत ते पुढील प्रमाणे.
- कृषी विभाग
- वन विभाग
- समाज कल्याण
- शिक्षण व्यवस्थापन
- दळणवळण
- बंधारे व्यवस्था
- ग्रामसुरक्षण सामान्य प्रशासन वैद्यकीय सेवा
1) कृषी विभाग
गावातील एकूण जमीन आणि साधन संपत्ती या सगळ्यांचे व्यवस्थापन करत पडित जमिनीचे योग्य ती विल्हेवाट करून लागवडी योग्य करण्याचे काम आणि सुधारित बी बियाणे शेतकऱ्यांना उत्पादन करण्यासाठी व्यवस्थापन करणे. पीक संरक्षणासाठी पिक विमा भरण्याचे प्रोत्साहन आणि खत तयार करण्याची योजना व शेतासाठी लागणारे इतर सामग्री यांची उपलब्ध करून देणे. शेतासाठी व तसेच गाईगुरांसाठी आवश्यक ती साधनांची उपलब्धी व तसेच संरक्षण देणे.
हे पहा – जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
2) वनविभाग
गावातील मोकळी किंवा गायरान जागेवर असलेल्या झाडांची व इतर प्रकृतीची संरक्षण करणे. तसेच त्यामध्ये असलेले पशूंचे संरक्षण करणे.
3) समाज कल्याण
- समाजाच्या हितासाठी आवश्यक त्या व्यक्तीला योग्य ती योजना मिळवून देणे.
- अपंग व्यक्तींना त्यांची योजना विषयी माहिती देणे.
- निराधार योजना विषयी माहिती देणे असे अनेक योजना जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणे.
- समाजामध्ये असलेले भ्रष्टाचार, अंधश्रद्धा निर्मूलन विषयी माहिती प्रधान करणे.
- गावात असलेली रस्ते, नाल्या व मागासवर्गीय यांची आर्थिक स्थिती सुधारणे.
- जुगार आणि दारूबंदीला सामोरे जाऊन बंद करणे त्यासाठी गावकऱ्यांशी संवाद साधने त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
- असे अनेक काम सरपंच त्याच्या नित्य निर्मळ मनाने लोकांची सेवा करणे.
हे पहा – Download Nirgam Utara in marathi pdf
4) शिक्षण व्यवस्थापन
- गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करणे.
- प्रत्येक घरातील मुलांना व व्यक्तीला शिक्षा प्रधान करणे.
- आपला गाव जास्तीत जास्त क्षमतेने साक्षर कसे वाढेल याच्याकडे लक्ष देणे.
- शिक्षणाचा महत्त्व किती आहे ते लोकांना पटवून सांगणे.
- शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे.
- शाळेत कमी असलेल्या विविध साधनांची प्रपाई करणे शाळेतील सामग्री आणि क्रीडांगणे यांची वेळोवेळी दक्षता घेणे.
- महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या शाळेच्या योजनेची योग्य ती मिळवून देणे.
- शाळेतील ग्रंथालय आणि वाचनालय याची सुधारणा व तसेच व्यवस्थापन करणे.
- शाळेतील मुलांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम व तसेच क्रीडा यामध्ये प्रोत्साहित करणे.
- असे अनेक काम या शिक्षण व्यवस्थापनामध्ये सरपंचाचे फार मोठे कर्तव्य असते.
5) दळणवळण
- या विभागात गावातील रस्ते नाल्या बांध फुल नसतील तर त्यांचे तक्रार वरील अधिकाऱ्यांशी करणे.
- असलेल्या नाल्या फोन रस्ते यांची वेळोवेळी दुरुस्ती करणे.
- रस्त्याच्या आजूबाजूस झाडे लावणे.
- रस्त्या मुळे त्यामुळे लोकांतील दळणवळण वाढेल व आर्थिक सुधारणा होते.
- रस्त्यांवर रात्रीच्या वेळी दिवा किंवा लाईट याची व्यवस्थापन करणे.
हे पहा – बोनाफाईड प्रमाणपत्र डाउनलोड करा
6) बंधारे
- गावात आवश्यक त्या ठिकाणी पाटबंधारे बांधून पाणी अडवून पाणी जिरवण्याचे काम करणे.
- पाटबंधारे बांधते वेळेस जे रोजगार लागतील ते गावातील रोजगार सेवकाच्या वतीने गावातील बेरोजगार लोकांना रोजगार देणे.
- पाणी आडवा पाणी जिरवा या योजनांमध्ये सहभाग होणे व गावात असलेल्या पाणीटंचाई दूर करणे.
7) वैद्यकीय सेवा
- गावातील लोकांना योग्य त्यावेळी प्राथमिक उपचार मिळवून देणे.
- गावात आरोग्य तपासणीची शिबिर करणे, सगळ्यांना आरोग्य सेवा प्रधान करणे.
- गावात आरोग्य शिबिर विषयी सगळ्यांना माहिती देणे व अंमलबजावणी करणे.
- लोकांमधील वैद्यकीय सेवा विषयी जागरूकता वाढवणे.
8) सामान्य प्रशासन व ग्रामसुरक्षा
- गावात कोणत्या प्रकारचे उत्पादन जास्त होते त्याची आराखडा राखणे.
- उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे.
- गावातील कृषी उत्पन्नाला प्रोत्साहित करणे व रोजगार उपलब्ध करून देणे.
- गावातील पिसाळलेल्या कुत्र्यांना योग्य ती वैद्यकीय उपचार करणे.
- रस्त्या नाले यांची योग्य ती देखरेख करणे.
- नाल्यांचा देखरेख केल्यामुळे रोगराई पसरणे बंद होते त्यामुळे आरोग्य सुधारते.
- गावात जत्रा यात्रा अशा प्रकारचे कार्यक्रम अमलात आणणे.
- असे अनेक काम सरपंच लोकसेवक या वतीने गावात अनेक योजना व माहिती आणि प्रोत्साहन करणे.
गावातील समस्या जर पंचायत समितीकडून होत नसतील तर त्याचे तक्रार योग्य त्या अधिकाऱ्याकडे करणे आणि त्याची निवारण करणे. राज्य सरकार व केंद्र सरकार ने दिलेल्या सर्व योजनांचे गावातील लोकांपर्यंत पोहोचवणे व त्यांच्यातील दुवा बनणे.
माझे प्रिय वाचक रसिकांनो सरपंच हापद गावातील लोकसेवक तथा गावातील प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो. सरपंच हा आपल्यातील एक व्यक्ती असून त्याला गावातील कार्यक्रम व योजना यामध्ये त्यांचा सहाय्य करणे. असे अनेक काम फक्त सरपंच नाही तर गावातील इतर व्यक्ती सुद्धा पार पाडू शकतात.
मी दिलेली वरील माहिती कशी वाटली त्याची खाली टिपणी लिहा.
माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना व मैत्रिणींना शेअर करा व आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद
It?¦s in point of fact a great and helpful piece of info. I am satisfied that you shared this helpful information with us. Please keep us up to date like this. Thank you for sharing.