ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार

ग्रामसेवक यांचे कार्य आणि कर्तव्य

पंचायत राज व्यवस्थेमध्ये गावातील ग्रामपंचायतला महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामपंचायत मध्ये लोकशाहीनुसार सरपंच व इतर सदस्यांचे निवड केली जाते.
परंतु शासनाचा एक दुवा म्हणून ग्रामसेवक हा सरपंच यांच्यानंतर कार्य करत असतो. ग्रामसेवकाचे महत्व गावांमध्ये फार महत्त्वाचे आहे यामुळे गावात होणाऱ्या सर्व कामांचे देखरेख शासनाकडून ग्रामसेवक हा करत असतो.
सरपंच यांच्यानंतर ग्रामसेवक त्या गावातील योजनांची अंमलबजावणी करतो व सरपंच व इतर सदस्यांचे काम देखील ग्रामसेवक करतो. ग्रामसेवक हा गावातील ग्रामपंचायत मध्ये सचिव किंवा ग्रामविकास अधिकारी असेही ओळखले जाते.
ग्रामसेवक यांचे निवड जिल्हा परिषद करत असते. ग्रामसेवकाचे वेतन हे जिल्हा निधीतून केली जाते.
ग्रामसेवकाची निवड गावाच्या विस्तार वर किंवा लोकसंख्येवर एक किंवा एकापेक्षा जास्त ही ग्रामसेवक यांची निवड केली जाते.

सरपंच कर्तव्य & जबाबदारी

ग्रामसेवक यांचे कर्तव्य / काम

ग्रामसेवक गावाच्या विकासा साठी, ग्रामपंचायत निधी, विविध अहवाल, ग्रामपंचाय ठराव, शासकीय योजनेची अंमलबजावणी त्या योजनेचे व्यवस्थापन व पत्रव्यवहार असे अनेक महत्त्वाचे काम शासकीय कर्मचारी म्हणून ग्रामसेवक हा गाव व जिल्हा परिषदा यामधील दुवा म्हणून कार्यरत असतो.

  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 व कलम 7 नुसार ग्रामपंचायतीच्या सहाय्याने ग्रामसभा घेणे.
  • मासिक सभा व त्या सभेविषयी नोटीस संबंधित ग्रामपंचायत व गावातील व्यक्तींना कळविणे.
  • झालेल्या ग्राम सभेमध्ये एखाद्या विषयावरची झालेल्या निर्णया बाबतची अंमलबजावणी करणे व त्याची पूर्तता करणे.
  • शासनाकडून येणाऱ्या विविध योजनेचे देखरेख करणे.
  • व त्या योजना मासिक सभेमध्ये कोणत्या स्थितीला आहे हे दाखवणे.
  • त्या योजनेविषयी संपूर्ण माहिती शासनाला कळविणे.
  • गावातील ग्रामपंचायत उत्पन्न व इतर योजना याच्या विषयी माहिती पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना देणे.
  • गावातील विकासासाठी पंचवार्षिक आराखडा राखणे.
  • वार्षिक आराखडा तयार केल्यानंतर प्रत्येक मासिक सभेमध्ये कोणत्या स्थितीत आहे त्याचे उल्लेख करणे.
  • ग्रामसभेत प्रस्ताव मंजूर झाल्यास समोरील कार्यासाठी आपल्या वर्चस्व अधिकाऱ्याला माहिती कळविणे.
  • ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या विकास कामा विषयी माहिती ग्रामपंचायत सूचना फलकावर लावणे.
  • सभेच्या वेळी आवश्यकता असेल तेव्हा कायदेविषयक सरपंच व उपसरपंच किंवा इतर सदस्यांना सल्ला देऊन आपले मत मांडणे.
  • ग्रामपंचायत जवळील सर्व माहिती जतन करणे.
  • सरपंच व इतर सदस्यांच्या मदतीने गावाच्या विकासाची कामे पार पाडणे.
  • राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या संबंधित सर्व अभिलेख जतन करून वेळोवेळी नोंद करून ठेवणे.
  • शासनाने ठेवलेल्या विविध ग्राम पंचायत कर व फीस यांची वसुली.
  • दर चार वर्षांनी कर आकारणीत वाढ करण्याचे सुचविणे व ग्रामपंचायत निधीची संपूर्ण जबाबदारी घेणे.
  • ग्रामसेवक हा ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्यामधील दुवा म्हणून ओळखला जातो तो यामध्ये पत्रव्यवहार देखील सांभाळतो.
  • ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व जमिनी, घर, रस्ते, पडीत जागा आणि इतर सार्वजनिक जागा या सर्वांचे कराराचे दस्तावेज व महत्त्वाचे दस्तावेज सांभाळून ठेवणे.
  • ग्रामपंचायतचा संपूर्ण नकाशा ग्रामपंचायत मध्ये लावणे.
  • जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी अशा बाबतच्या रजिस्ट्रेशन करून त्यांचे प्रमाणपत्र काढून सचिव म्हणून कर्तव्य पार पाडणे.
  • गावातील कार्यरत असलेल्या सोसायटी, बालवाडी किंवा अंगणवाडी, प्राथमिक व तसेच माध्यमिक आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी संबंध ठेवून गावात उपयोगी असलेल्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करणे व राबविणे.
  • ग्रामपंचायत हळदीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियमाचे किंवा कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे कृती आढळत असल्यास त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविणे.
  • निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना आणि आदेशाचे काटेकोर पालन.
  • ग्रामपंचायत सर्व सदस्यांवर व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य
  • गावातील कर वसुली करण्याची जबाबदारी.
  • शासनाच्या नियमानुसार रोजच्या हिशोब व भविष्यातील निधी किंवा इतर शासनाच्या योजना यांचे माहिती ठेवणे.
  • दारिद्र्य रेषेखालील गावातील लोकांचे वेळोवेळी सर्वेक्षण करणे.
  • गावातील उद्योग धंद्यात वाढ करणे व रोजगार उपलब्ध करून देणे.
  • शासनाकडून आलेल्या सर्व सूचना किंवा मार्गदर्शनाचे पालन करणे.
  • गावातील गटारे, सांडपाणी व स्वच्छता पशुविकास, बालविकास, रस्ते दुरुस्ती, साक्षरता मोहीम अशा बाबतच्या शासनाकडून येणाऱ्या सूचनाचे पालन करणे व नियोजन करणे.
  • जिल्हा परिषदे कडून येत असलेल्या जाहीर योजना गावातील ग्रामसभेमध्ये किंवा मासिक सभेमध्ये ग्रामस्थानकांपर्यंत पोहोचविणे.
  • बालविकास कल्याण साक्षरता अंधश्रद्धा निर्मूलन समाज कल्याण आणि इतर स्थानिक संस्था यांचे सहकार्य किंवा मदत घेऊन गावामध्ये जनजागृती करणे.
  • गावातील पशुसंवर्धनाविषयी व त्याच्या योजनेविषयी प्रोत्साहन करणे व तसेच जनावराच्या वाढीचे उत्तेजन करणे.
  • गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे.
  • गावातील पाण्याच्या टाकी दुरुस्ती किंवा देखभाल करण्यासाठी योग्य त्या औषधाचा पुरेसा वापर करणे.
  • गावात कोणत्याही प्रकारचे समस्या उद्भवत असल्यास संबंधित त्या खात्याला कळविणे आणि ग्रामपंचायतीला योग्य ती मदत मिळविणे.
  • तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्याकडून आलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे व शासनाकडून येत असलेल्या सूचना व कामे प्रामाणिकपणाने पार पाडणे हे ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाची कार्य असते.

ग्रामपंचायत मधील विकास कामावर अहवाल तयार करण्यात किंवा तयार केलेल्या अहवालाची माहिती सूचना फलकावर लावण्यास काही निष्काळजीपणा करत असतील, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियमानुसार ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाही करू शकतात किंवा तो ग्रामसेवक या शिक्षेस पात्र असेल.

5 LIC पॉलिसी ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास मिळतील अनेक फायदे

योग्य मार्गदर्शन करणे हे प्रथम ग्रामसेवकाचे कर्तव्य असेल.

ग्रामीण विभागामध्ये दैनंदिन व्यवहारात येत असलेल्या संबंधित शासकीय कर्मचारी म्हणजे तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक हे असतात.
गावातील सरपंच व इतर सदस्यांना त्यांच्या कामात योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी हे ग्रामसेवक करत असतो. ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी अनुभवी किंवा शिकलेले नसतील तर त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून ग्रामसेवक यांच्या सहकार्याची आवश्यकता भासत असते. अशाच वेळी ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या विकास गतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका असते.

ग्रामसेवक यांच्याबाबतचे तक्रार

वरी दिलेल्या प्रमाणे ग्रामसेवकाची महत्त्वाची भूमिका असते. परंतु काही ग्रामसेवकांकडून योग्य ते कार्य पार पाडले जात नाहीत अशा स्थितीमध्ये ग्रामसेवकाबाबत तक्रार केल्या जातात.
ग्रामसेवकांविरुद्ध तक्रार करणे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे जे की गावातील लोक त्याची माहिती नसते किंवा उपलब्ध नसते.
अशा कारणांमुळेच गावातील ग्रामसेवक त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारीचे पालन करण्यास असमर्थ राहतात. ज्या गावात त्यांचे नोकरी असते त्या गावात ते वास्तव्यात स्थायिक नसतात त्यामुळे ग्रामसेवक त्यांच्या सोयीसाठी इतर गावांमध्ये नोकरीसाठी येतात. अशा स्थितीमध्ये ठराविक लोकांना देखील भेटतील त्याची खात्री नाही.
ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी आणि गावातील काही ठराविक लोक त्यांची मर्जी सांभाळणे आणि सामान्य लोकांशी कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवणे अशी स्थिती दिसून येते.

काही ग्रामसेवकांना इतर अडचणींमुळे किंवा गावातील लोकसंख्येमुळे एका ग्रामसेवकास दोन किंवा अधिक ग्रामपंचायतीचे जबाबदारी दिले जातात. ज्या ग्रामसेवकांवर एक किंवा अधिक ग्रामपंचायतीचे जबाबदारी असतात. तेव्हा ग्रामसेवकास जास्तीत जास्त कष्टमय कसरत करावी लागते. परंतु काही ग्रामसेवक या पदाचा गैरवापर देखील करत असतात.

ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचार किंवा अत्याचार अशा गैरव्यवहाराबाबत बऱ्याच वेळा आपल्याच ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक व इतर सदस्यांचा सहभाग असतो. सामान्य लोकांना प्रशासनाचे आणि आर्थिक व्यवहाराची माहिती नसल्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ग्रामसेवक त्यांच्या कार्य आणि जबाबदारी पासून दूर राहतो आणि गैर वर्तवणूक किंवा गैरफायदा ग्रामसेवक घेत असतो. अशा अनेक ठिकाणी ग्रामसेवक व पदाधिकारी हे दोघेही एकमताने सुद्धा भ्रष्टाचार केल्याचे उदाहरणे भरपूर आहेत. कित्येक ग्रामसेवक आपल्या गावाच्या विकासासाठी गावाला समृद्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात त्यामुळे ग्रामसेवकाची महत्त्वाची भूमिका हे ग्रामपंचायतीमध्ये भासत असते.

ग्रामपंचायत मधील सर्वसामान्य लोकांना आणि पदाधिकारी लोकांना योग्य ते मार्गदर्शन, विविध योजनांचे माहिती व गावातील लोकांचे सहाय्य घेऊन विविध कार्यक्रम करणे ग्रामीण विकासातील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.

ग्रामसेवक विषयी जर तक्रार किंवा ग्रामसेवक त्यांच्या कार्य आणि जबाबदारी पासून गैरफायदा घेत असल्यास त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास अर्ज करून सुद्धा तक्रार नोंद करू शकता.

>>>सरपंच कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार

>>>जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

>>>पोलीस पाटील यांचे मानधन किती?

>>>पोलीस पाटील होण्यासाठी पात्रता

>>>बाल संगोपन योजना 2024

4 thoughts on “<strong>ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार</strong>”

  1. Very nice post and right to the point. I am not sure if this is in fact the best place to ask but do you people have any thoughts on where to employ some professional writers? Thanks 🙂

    Reply
  2. I have read some excellent stuff here. Certainly value bookmarking for revisiting. I wonder how much attempt you put to make this sort of fantastic informative website.

    Reply

Leave a Comment