प्रधानमंत्री आवास योजना
नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये आपल्या ग्रामपंचायत मध्ये एकूण किती घरकुल आलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती फक्त एका मिनिटातच आपल्या मोबाईल मधून घरी बसून यादी चेक करू शकता.
अशा प्रकारचे महत्त्वाची बातमी माहिती आपल्या जवळील मित्रांना नक्की पाठवा.
प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमध्ये गरीब लोकांना राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून अनेक लाभार्थ्यांना घर देण्याचे घरकुल यादीत नाव येत आहे.
परंतु काही कारणांमुळे लाभार्थ्यांना यादी कशाप्रकारे पाहता येते हे समजतच नाही!
घरकुलाची नवीन यादी कशाप्रकारे तपासू शकता याची आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण लाभ
ग्रामीण विभागातील अनेक लाभार्थी घरकुल साठी पात्र आहेत परंतु यादीमध्ये अनेक गरीब लाभार्थ्यांचे नाव अजून सुद्धा आले नाहीत. मग या गरीब लाभार्थ्यांना घरकुल मिळणार का नाही हा प्रश्न नक्की येतो…
या योजनेमध्ये गरीब लोकांना ज्यांना स्वतःचे पक्के घर नाही. त्याच लोकांना घरकुल मिळणार आहे.
राज्यातील ग्रामीण भागात 15 वर्षापेक्षा जास्त आदिवासी किंवा रहिवासी असलेल्या इतर मागासवर्गा मधील लाभार्थ्यांना ही योजना ऑटोमॅटिक सिस्टीमच्या सहाय्याने जिल्हा समितीने शिफारस केलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार किंवा मिळणार आहे.
घरकुल योजनेमध्ये इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी किंवा कच्च्या घराचे पक्के घर करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते.
परंतु लाभार्थ्याकडे 269 चौरस फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम क्षेत्र असणे आवश्यक असेल.
घरकुल आवास योजना अर्ज,पात्रता,यादी कशी तपासावी,कागदपत्र
प्रधानमंत्री आवास योजना कोणाला मिळणार फायदा किती त्यासाठी पात्रता व कोणकोणते कागदपत्र लागतात आणि त्यासाठीचा अर्ज
नमुना नं 8 चा उतारा | Namuna No 8 pdf in Marathi
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना साठी लागणारे कागदपत्र व अर्ज.
प्रधानमंत्री आवास योजना मध्ये अनेक लाभार्थ्यांचे नाव आलेले असून त्या लाभार्थ्यांना खालील कागदपत्र व तसेच त्यासोबत जोडाव्याचा अर्ज जोडून ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करावे लागणार आहे.
तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात व कोणत्या प्रकारचा अर्ज लागतो ते या लेखांमध्ये बघूया.
- विहित नमुन्यातील अर्ज
- शपतपत्र
- सक्षम अधिकारी यांच्याकडून जातीचा दाखला.
- जातीचे प्रमाणपत्र नसल्यास शपतपत्र
- करारनामा
- माननीय तहसीलदार यांच्याकडून घेतलेला उत्पन्नाचा दाखला.
- महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र.
- कायमस्वरूपी रहिवासी असलेला असणे अनिवार्य.
- कोणत्याही प्रकारचे घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याचा दाखला.
- राहत असलेल्या कच्च्या घराचे फोटो.
- लाभार्थ्याची बांधकामास असलेली जागा किमान 269 चौरस फूट इतके असले बाबतचे कागदपत्र.
- स्वतःच्या मालकीचे जागेचा पुरावा म्हणजेच नमूना 8 उतारा, सातबारा उतारा किंवा ग्रामपंचायत जागा देण्यास तयार असेल तर ग्रामपंचायतीचा दाखला किंवा ठराव.
- राशन कार्ड ची प्रत.
- राष्ट्रीयकृत कोणत्याही बँकेचे पासबुक.
- आधार कार्डची झेरॉक्स
- मनरेगा म्हणजेच जॉब कार्ड ची नोंदणी असल्याची प्रत.
- मनरेगा जॉब कार्ड क्रमांक
- आणखीन कोणत्याही प्रकारचे कागदपत्र जोडाव्याचे असल्यास जोडू शकतात.
- मतदान कार्ड
- इलेक्ट्रिसिटी बिल
हे सर्व कागदपत्रे जोडून आपल्या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक व सरपंच यांचा आठ उतारावर सही व शिक्का घ्यावी.
प्रधान मंत्री आवास योजना अर्ज डाउनलोड करा.
अर्जामध्ये अर्जदाराची संपूर्ण नाव,पत्ता, जात, जन्मदिनांक, लिंग, अपत्यांची संख्या, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, शैक्षणिक पात्रता, कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहात, वार्षिक उत्पन्न किती, स्वतःच्या मालकीची जागा आहे का ? असेल तर किती जागा आहे?
त्याचे 8 उतारा प्रत लावले आहे का? ह्या सगळ्या बाबी अर्जामध्ये भरून वरी दिलेले सर्व कागदपत्र जोडून ठरवलेल्या अधिकाऱ्याकडे किंवा पंचायत समितीमध्ये जमा करावे.