असा भरा ऑनलाइन एक रुपयात पिक विमा | How to Apply Pik Vima Yojana Maharashtra

पीक विमा योजना

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या पोस्टमध्ये एक महत्त्वाची योजना विषयी माहिती घेणार आहोत.
ती योजना म्हणजेच शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपया मध्ये पिक विमा भरता येणार. पिक विमा कशा पद्धतीने भरता येईल याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.
पिक विमा भरण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागणार आहेत त्याची देखील माहिती खाली दिली आहे. ज्या योजनेचे लाभ कोण घेऊ शकतात आणि त्या विमाचा हप्ता कशा पद्धतीने भरला जाईल ह्या संपूर्ण बाबी आपण या पोस्टमध्ये बघूया.

पिक विमा स्वयंघोषणा pdf

एक रुपया मध्ये पिक विमा भरल्यानंतर उर्वरित रक्कम महाराष्ट्र राज्य सरकार कडून भरले जातील.
या पिक विमा योजनेमध्ये खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात 14 पिकांसाठी पिक विमा करता येते. त्यामध्ये सोयाबीन कापूस तीळ कारले तूर मूग मक्का उडीद बाजरी भात भुईमूग ज्वारी कांदा असे अनेक पिकांसाठी पिक विमा भरता येते.
पिक विमा भरण्यासाठी खरी व रब्बी हंगामा करिता शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत दिली जाते या कालावधीमध्ये शेतकरी स्वतः देखील पिक विमा भरू शकतो.

PM Shram Yogi Maandhan Yojana Details

पिक विमा योजनेचे काही उद्दिष्टे

शेतकऱ्यांच्या पिकांवर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्याकरिता या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळवून शेतीमध्ये वाढवणे.
नैसर्गिक आपत्ती म्हणजेच दुष्काळ गारपीट अतिवृष्टी अवकाळी पाऊस, चक्रीवादळ किंवा कीटक प्रादुर्भाव.

पिक विमा म्हणजे काय

शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान भरून देण्याकरिता किंवा संरक्षण देण्याकरिता पिक विमा या योजनेचे राबविण्यात येतो.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी या पीक विमा योजना राबविण्यात येते.

ई पीक पाहणी झाल्याच शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई

पिक विमा योजना अर्ज

या संकेतस्थळावर किंवा सीएससी केंद्रावर देखील पिक विमा भरू शकता. या योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल संबंधित तालुक्यातील पीक विमा कार्यालयास किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावी.

पिक पेरा स्वयंघोषणापत्र

असा भरा ऑनलाइन पीक विमा

Leave a Comment