ग्रामपंचायत कर आणि फी नियम
गावाच्या विकासासाठी गाव समृद्ध व्हावी या हेतूने पंचायत राज याची स्थापना करण्यात आली. व तसेच देशातील नागरिकांना आपल्या हक्क व अधिकार प्राप्त व्हावे. म्हणून आपल्या देशात पंचायत राज लागू करण्यात आली. हे 1 मे 1959 ला महाराष्ट्र मध्ये स्वीकारण्यात आले.
हे वाचा – ग्रामसभेचे नियम, अटी व संपूर्ण माहिती
ग्रामपंचायत कर आकारणी कशी केली जाते.
गावातील इमारती व जमिनीवर कर आकारणी करण्याचा अधिकार ग्रामपंचायतला देण्यात आला आहे. निवासी व तसेच औद्योगिक वापरा नुसार घरपट्टी आकारणी केली जाते.
ग्रामपंचायत हदीमध्ये बांधण्यात आलेल्या अनाधिकृत व अधिकृत बांधकामावर कर आकारणी करणे हे ग्रामपंचायतला बंधनकारक आहे.
घरपट्टी आकारण्यासाठी संबंधित त्या घराचे ग्रामपंचायत नमुना नंबर 8 ला नोंद असणे अनिवार्य आहे.
पूर्वी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या घरांना प्रत्येक चौरस फुटावर घरपट्टी आकारले जात होती परंतु त्यात काही बदल करून घरपट्टी आकारणी अधिसूचना जाहीर केली.
हे वाचा – सरपंच किंवा उपसरपंच अविश्वास ठराव
दिवाबत्ती व पाणीपट्टी कर
पाणीपट्टी कर हे पाणीपुरवठा केल्यामुळे आकारण्यात येते साधारणता हे पाणी सार्वजनिक पाणी साठ्याद्वारे लोकांपर्यंत पाणी पुरविला जातो. नळ जोडणी असेल तर त्या नळाच्या आकारानुसार दर ठरविले जाते.
त्यासोबतच दिवाबत्ती करही आपल्याकडून आकारली जाते त्यामध्ये विज बिल, गावातील स्वच्छता, जंतुनाशक फवारणी या सगळ्या बाबींचा विचार करून कर आकारणी केली जाते.
ग्रामपंचायत कर भरला नाही तर
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार ग्रामपंचायतीला कर भरावाच लागतो, कर हे कधीही माफ होत नाही. आणि थकबाकी असलेल्या रकमेवर दरवर्षी व्याज सुद्धा भरावे लागत असते. ग्रामपंचायत कर भरण्याचा नोटीस पाठवून देखील कर भरला नाही तर त्या रकमेच्या वस्तू जप्त करून लिलाव करण्याचा अधिकार ग्रामपंचायत मध्ये आहे.
हे वाचा – ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार
ग्रामपंचायत करातून कोणाला सूट मिळते
महाराष्ट्रातील माजी सैनिक व विधवा / पत्नी यांना मालमत्तेच्या करारातून सूट देण्यात येते. एखादी घर किंवा झोपडी सलग तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक दिवस रिकामी असतील तर कर पासून सूट मिळते किंवा त्या कराची रक्कम परत मिळू शकते. परंतु त्यासाठी ग्रामपंचायतला रिकामी किंवा अनु उत्पादित असलेल्या बाबतची लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.
हे वाचा – सरपंच कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार
ग्रामपंचायत कलाकार आणि संबंधित काही नियम
- एक एप्रिल ते 31 मार्च यादरम्यान गृहीत धरून कर आकारणी करतात.
- आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच पहिल्याच सहा महिन्यात ग्रामपंचायतला कर भरला तर त्या व्यक्तीला पाच टक्के सवलत मिळेल.
- चालू वर्षामध्ये कर नाही भरला तर करदात्यावर थकी कराच्या 5 टक्के दंड भरावा लागतो.
- कर आकारणी ची यादी दर चार वर्षांनी हे कर आकारणी समितीकडून सुधारित करतात.
- सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याद्वारे नेमणूक केलेल्या व्यक्तीस कर आकारणी करता येते. परंतु त्या व्यक्तीने कर आकारणी केल्याची किंवा भरल्याची पावती करदात्याला देणे आवश्यक आहे.
- ज्या ग्रामपंचायत मध्ये 90% कर भरली जाते किंवा कर वसुली केली जाते त्याला 100 टक्के कर्मचारी अनुदान मिळत असते.
- कोणत्याही प्रकारचे कर किंवा फी आकारल्यामुळे व्यतीत झालेल्या व्यक्तीला पंचायत समितीकडे अपील करता येते. व तसेच पंचायत समितीच्या विरुद्ध स्थायी समितीकडे अपील करता येते मात्र स्थायी समितीचा निर्णय हे अंतिम निर्णय असतो.
हे वाचा – PM Shram Yogi Maandhan Yojana
बांधवांनो ग्रामपंचायत कर ही व्यक्तीला चुकलेला नाही तो कर किंवा फी आज न उद्या भरावाच लागणार आहे. हे कर दंडासहीत लवकरात लवकर भरून घ्या आणि त्यावर पाच टक्के सवलत मिळवा. कर वसुली शंभर टक्के पूर्ण झाल्यास ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेतन भेटते. जर कर वसुली नाही झाली तर ग्रामनिधीतून हा खर्च केला जातो.