प्रधानमंत्री सूर्योदय योजना फ्री (Free) वीज मिळणार जाणून घ्या..

प्रधानमंत्री सूर्योदय योजना

प्रधानमंत्री सूर्योदय रूट ऑफ सोलार योजना यामध्ये गरीब नागरिकांना मोफत लाईट किंवा इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे.
ही योजना 22 जानेवारी 2024 रोजी प्रधानमंत्री यांनी अनाउन्समेंट केली आहे.
या योजनेचे मुख्य कारण एनर्जी बचत करणे होय, सोलार योजना यामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड कमी होतो म्हणजेच वीज तयार करताना जी कार्बन-डाय-ऑक्साइड किंवा इतर गॅसेस बाहेर पडतात या योजनेमध्ये त्या गॅसेस कमी करता येतात.
ही एक समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी आपल्या प्रकृतीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे याच्या वापरामुळे प्रकृती चांगली राहते आणि कोणतेही दुष्परिणाम मानवी जीवनावर पडणार नाही.
ही योजना शेतकऱ्यांसाठी व तसेच गावातील इतर नागरिकांसाठी नक्कीच लाभदायक असणार. ही योजना केंद्र सरकारच्या वतीने चालणार आहे तर यासाठी लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि त्यांना 78 हजार पर्यंत सबसिडी देखील दिली जाते अधिक माहितीसाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिसला भेट द्या.

पीएम सूर्योदय | PM Suryoday Yojana

अनेक गावांमध्ये 24 तास वीज पुरवणे साध्य होत नाही त्यामुळेच केंद्र सरकारच्या वतीने सूर्योदय सोलार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकांना 24 तास वीज पुरवठा होऊ शकते. अशा अनेक कारणांमुळे वीज पुरवठा करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना राबविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात त्याची लिस्ट खालील पद्धतीने दिली आहे.

  • विज बिल
  • मोबाईल नंबर
  • अर्जदाराचे बँक पासबुक

हे वाचा – पोलीस पाटील विषयी माहिती | पोलीस पाटील म्हणजे काय? त्यांची कर्तव्य?

अर्ज करण्याची प्रोसेस

ऑनलाइन अर्ज करण्या पहिले तुमच्याकडे वरील दिलेले सर्व कागदपत्र व इतर आवश्यक माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

नोंदणी करण्याची प्रोसेस | Registration Process
  • सर्वप्रथम https://pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावरती जा
  • या ठिकाणी तुम्हाला अर्जदार नोंदणी वरती क्लिक करा.
  • अर्जदार नोंदणी यामध्ये तुमचा राज्य आणि जिल्हा निवडा.
  • तुमचा मोबाईल नंबर टाका
  • त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव भरून घ्या.
  • प्रोसीड या बटना वरती क्लिक करून ओटीपी पाठवा.
  • त्यानंतर कॅपच्या टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करा.

हे वाचा – महिलांना मिळणार दरमहा 3000 रुपये पोस्ट ऑफिस ची नवीन योजना

लॉगिन करण्यासाठी प्रोसेस | Login Process

अशाप्रकारे नोंदणी केल्यानंतर लॉगिन करण्याची प्रोसेस खालील पद्धतीने दिली आहे.

  • कंजूमर लॉगिन (Login) या बटनावरती क्लिक करा.
  • तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकून OTP सेंड करा.
  • आणि कॅपच्या टाकून लॉगिन या बटनावरती क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस | How to Apply Online Solar Yojana

अर्ज करताना तुम्हाला तीन महत्त्वाच्या डिटेल्स भरायचे आहेत ज्यामध्ये तुमचे वीज बिल क्रमांक आणि तुमचे बँक डिटेल्स व तुमचा मोबाईल नंबर.

  • अर्ज करते वेळेस सर्वप्रथम तुमचा संपूर्ण नाव टाकून घ्या.
  • तुमची कॅटेगिरी कोणती आहे ते सिलेक्ट करा.
  • कोणत्या ठिकाणी तुम्हाला हा सोलार पॅनल बसवायचा आहे त्याचा ऍड्रेस संपूर्ण टाकून घ्या.
  • तुमच्या गावाचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करा.
  • तुमचा सहा अंकी पिन कोड टाका.
  • त्यानंतर तुमचा तालुका किंवा सब डिव्हिजन ऑफ इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन सिलेक्ट करा.
  • तुम्हाला किती किलोवॅटचा कनेक्शन लागणार हे सिलेक्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला सेव अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा.
  • सेव्ह केल्यानंतर तुमचा बँक पासबुक अपलोड करा.
  • भरलेला संपूर्ण फॉर्म एकदा तपासून घ्या व फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करा.
  • फायनल सबमिशन नंतर गो ग्रीन टू बँक डिटेल्स या ऑप्शन मध्ये बँकेचे अकाउंट नंबर आयएफसी कोड आणि नाव हे संपूर्ण डिटेल्स भरून घ्या आणि सबमिट करा.

हे वाचा – ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार

सूर्योदय सोलार योजनेचे फायदे | Benefits Of Solar Yojana

  • या योजनेमध्ये लाभार्थ्यांना मोफत वीज भेटणार आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
  • सोलार योजनेसाठी भारतातील नागरिक कोणीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • यामध्ये 78 हजार पर्यंत सबसिडी देखील दिली जाणार.
  • ज्यांना 24 तास वीज आवश्यक आहे त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायक राहणार आहे.
  • विज बिल साठी येणारा खर्च किंवा बिल हे मोफत होतात.
  • ही योजना 01 kw पासून ते 10 kw पर्यंत पुरवठा केला जातो.
  • या योजनेसाठी घरगुती व तसेच शेतीसाठी सुद्धा अर्ज करू शकता.
  • सोलार पॅनल बसविण्यासाठी गव्हर्नमेंट व तसेच प्रायव्हेट ऑफिस देखील करू शकतात.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही योजना फ्री ऑफ कॉस्ट नसून केंद्र सरकारकडून 78 हजार पर्यंत सबसिडी दिले जाते ज्याच्या सहाय्याने नागरिक आवश्यक त्या ठिकाणी सोलर पॅनल बसवून वीज वापर करू शकतो.

धन्यवाद

1 thought on “<strong>प्रधानमंत्री सूर्योदय योजना फ्री (Free) वीज मिळणार जाणून घ्या..</strong>”

Leave a Comment