आज आपण या पोस्टमध्ये बघणार आहात. शेळीपालन योजनेचा फॉर्म कसा डाऊनलोड करावा व तसेच शेळी पालन किंवा बकरी पालन योजनेची सविस्तर माहिती.
महाराष्ट्र मध्ये बकरी शेळी पालन योजनेमध्ये 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तरी ज्यांना कुणाला यांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी फॉर्म डाऊनलोड करून त्याच्यावरती योग्य अधिकाऱ्याची सही व स्टॅम्प घेऊन सबमिट करावे.
शेळीपालन लोन योजनेचा फॉर्म
योजनेचे नाव | बकरी / शेळीपालन योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
उद्देश | रोजगार संधी वाढवणे |
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ | Click Here |
फॉर्म | डाऊनलोड |
या योजनेसाठी कोण पात्र राहणार याची माहिती घेऊया
पात्रता
- ज्यांच्याकडे एक हेक्टर पर्यंत जमीन आहे (शेती)
- सुशिक्षित अथवा बेरोजगार युवा
- महिला स्वयंसहायता बचत गट A to Z
शेळीपालन अनुदान योजनेत भाग घेण्यासाठी करावयाची प्रक्रिया
महाराष्ट्र राज्याने ही एक नवीन योजना राबविण्यात आली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील नागरिक भाग घेऊ शकतात ते खालील प्रमाणे अर्ज करावे.
1. सगळ्यात पहिले शेळी पालन योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा. खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून
2. त्यानंतर त्यामध्ये जी माहिती भरायची आहे ते पूर्णपणे भरून घ्यावा.
3. त्या फॉर्ममध्ये जे काही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र मागत आहे त्यांची झेरॉक्स कॉपी त्या फॉर्मला जोडावे.
4. हे झाल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म व कागदपत्र जाऊन संबंधित कार्यालयामध्ये जमा करावी.
5. तुमच्या फॉर्मची व कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
6. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल .
7. अशाप्रकारे या योजनेसाठी फॉर्म भरून सबमिट करू शकता.
धन्यवाद