Site icon Shelke Tech

मोबाईल फोन नेमका किती तास पाहावं बघा काय सांगतात वैद्यकीय अधिकारी…

mobile use

mobile

आजच्या या धावपळत्या युगामध्ये मोबाईल चा मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे. यामध्ये मोठ्यांपासून ते लहान पर्यंत सर्वेजन व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट अशा कित्येक ॲप्स जे आहेत तासंतास ऑनलाइन राहतात ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले की कोरोनाच्या काळात (ऑनलाइन) क्लासेस करिता पालकांनी मुलांना मोबाईल देऊन क्लासेसची सवय लावली होती. सध्या तरी मोठी माणसं असो अथवा लहान मुलं प्रत्येकाला मोबाईल वापरण्याचे सवय किंवा व्यसन लागली आहे.

या मोबाईलच्या सवयी सर्वात जास्त लहान मुलांवर परिणाम होतो लहान मुलांच्या मानसिक स्थितीवर तसेच डोळ्यांवर याचा लवकरच परिणाम होतो या फोनचे फायदे अनेक असून सुद्धा याचे तोटे पण बरेच आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की सतत मोबाईल वापरल्याने किंवा पाहिल्याने मुलांमध्ये हायपोथालीमस नावाच्या ग्रंथीचा योग्य विकास होत नसल्यामुळे बरेच असे शारीरिक आणि मानसिक विकास होत नाहीत. सतत मोबाईल वापर केल्यामुळे मुलांना मोबाईल पाहण्याचे व्यसन लागू शकते. जास्तीत जास्त वेळा मोबाईल फोनचा वापर केल्यामुळे डोळ्यांवरही दुष्परिणाम होतात याची दक्षता पालकांनी घ्यावी, तर त्यासाठी मोबाईल किती वेळा वापरावा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणतात की फोन रात्री उशिरापर्यंत तसेच सतत वापर केल्याने डोळ्यांच्या बबुळ जे रेटिना नावाने ओळखले जातात. त्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
कारण या कारणामुळेच व्यक्तींची जवळची दृष्टि कमी होते, म्हणूनच प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला किंवा स्वतःला शिस्त लावावी आणि मोबाईल फोनचा वापर सतत न करता थोड्या थोड्या वेळाने किंवा आवश्यक तेव्हा वापरावे, मोबाईल फोन किती तास सतत वापरल्याने डोळ्यांच्या बबुळ वर व तसेच डोळ्यांवर इजा होऊ शकते म्हणून पालकांनी मुलांना व तसेच स्वतःसाठी ठराविक वेळच फोन वापरावी.

Exit mobile version