बांधकाम कामगार योजना
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये बांधकाम कामगार योजने संबंधित संपूर्ण माहिती घेणार आहोत. या योजनेमध्ये कोणकोणते अटी राहणार आहेत, तसेच यामध्ये पात्रता कोण आहे, त्याचे फायदे काय आहेत त्यासाठी नोंदणी कशी करावी, या योजनेचा लाभ कसा घ्यावा, याची संपूर्ण उल्लेख या लेखांमध्ये केली आहे.
ही योजना नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध योजना सुरू केले आहेत त्यातील ही एक आहे. या योजनेमुळे बांधकाम कामगारांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला जातो. बांधकाम कामगारास सामाजिक सुरक्षा, आरोग्यविषयक सहाय्यक, आर्थिक सहाय्यक आणि त्यांच्या मुलाचे शिक्षण अशा विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी या योजनेअंतर्गत सुरू केले आहेत या योजनेमुळे विविध कामगारांना रोजगार व आर्थिक मदत म्हणून दिला जाणार आहे.
mahabocw.in या योजनेचे उद्दिष्ट
- बांधकाम कामगारांना रोजगार मिळवून देणे.
- त्यांचे कौशल्य वाढवणे.
- बांधकाम कामगारांसाठी जीवन विमा व अन्य सुविधा उपलब्ध करून देणे.
- बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत देण्यासाठी.
- कामगारांसाठी रोजगार क्षमता आणि संधी वाढवणे.
- धोकादायक परिस्थितीमध्ये बालक कामगारांना काम न करू देणे.
- सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना उपलब्ध करून देणे.
- बांधकाम कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे.
- घातक कामापासून बाल श्रम मध्ये अंमलबजावणी करणे.
- रोजगार सेवा आणि कौशल्य विकास यांचा प्रचार करणे.
- असे अन्य बांधकाम कामगाराच्या जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केला आहे.
Bandhkam Kamgar Yojana Nondani Forms PDF
बांधकाम कामगार योजना पात्रता
- या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी वय मर्यादा 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक.
- स्वतःचे आधार कार्ड व अन्य कागदपत्रे असणे आवश्यक.
- बांधकाम कामगार किंवा अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक.
- मागील एक वर्षांमध्ये 90 दिवसापेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी करणे आवश्यक.
AADHAAR UPDATE PROCESS / CORRECTION FORM
बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारे कागदपत्रे
आधार कार्ड, पॅन कार्ड, दारिद्र्य रेषेखालील राशन कार्ड, काम करत असल्याचा पत्ता, उत्पन्न दाखला, मतदान कार्ड, रहिवासी पुरावा, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो तीन, 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा दाखला, ठेकेदार किंवा इंजिनियर किंवा ग्रामसेवकांकडून किंवा महानगरपालिकेकडून घेतलेला प्रमाणपत्र.
स्थानिक पत्ता कायमचा पत्ता ग्रामसेवकाकडून घेतलेला बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र.
नोंदणी फीस 25/- रुपये वार्षिक वर्गणी 60/- रुपये आणि पाच वर्षाकरिता व मासिक वर्गणी 1/- रुपये.
बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
वयाचे पुरावे (कोणतेही एक)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वाहन चालक परवाना
- जन्म दाखला
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टीसी)
रहिवासी पुरावे (कोणतेही एक)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वाहन चालक परवाना
- मागील महिन्याचे लाईट बिल
- ग्रामपंचायत ओळखपत्र.
90 किंवा अधिक दिवसाच्या कामाचा प्रमाणपत्र (कोणतेही एक)
- ठेकेदार
- ग्रामसेवक
- महानगरपालिका
- नगरपालिका
- प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रमाणपत्र
ओळख पुरावे (कोणतेही एक)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वाहन चालक परवाना
- मतदान कार्ड
बँकेचे पासबुक
पासपोर्ट साईज फोटो 3
बांधकाम कामगार योजनेचे फायदे
बांधकाम कामगारांसाठी विविध अशी योजना राबवल्या जात आहेत तसेच या योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा आरोग्य विषयक सहाय्यक शैक्षणिक सहाय्यक आर्थिक सहाय्यक असे अनेक योजना या अंतर्गत राबविल्या जात आहे हे आपण सविस्तर बघूया.
सामाजिक सुरक्षा
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांना स्वतःच्या विवाह साठी 30000/- हजार रुपये अनुदान म्हणून दिले जातील. त्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र व त्यांचे आधार कार्ड.
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन या योजनेचा लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिला जाईल.
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आवश्यक असलेले अवजारे खरेदी करण्यासाठी 500/- रुपये प्रत्येक कुटुंबाला आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते, या योजनेसाठी अवजारे खरेदी करणार असल्याचे हमीपत्र आवश्यक.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या अंतर्गत विविध लाभ दिले जाते.
- पात्र असलेल्या कामगारांना आवश्यक ते प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाते.
आरोग्यविषयक सहाय्यक
- नोंदणीकृत स्त्री बांधकाम कामगार नैसर्गिक प्रसुतीसाठी 15000/- हजार रुपये आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी 20000/- हजार रुपये दिले जाते. या योजनेचे लाभ घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता.
- बांधकाम कामगार लाभार्थ्याच्या कुटुंबीयांना गंभीर आजार असेल किंवा झाले तर त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय सहाय्य म्हणून (100000/-) एक लाख रुपये एकाच सदस्याला एकावेळी दोन सदस्यांना दिले जाते.
- या योजनेचा लाभ जर कामगारास आरोग्य विमा लागू नसल्यास या योजनेचा लाभ घेता येते, या योजनेचे लाभ घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून गंभीर आजार असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
- बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केली तर त्यांना मुलींच्या नावे एक लाख रुपये 18 वर्षापर्यंत मुदत ठेव लाभ दिला जाते.
- या योजनेचे लाभ घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आणि नोंदणीकृत कामगाराला एकापेक्षा अधिक मुली नाहीत याचा पुरावा किंवा शपथपत्र.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराला 75% टक्के किंवा कायमचे अपंगत्व येत असल्यास किंवा आल्यास त्या कामगाराला 200000/- दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातील.
- या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देखील घेता येणार आहे. या योजनेमध्ये नोंदणीकृत कामगारांची वेळोवेळी तपासणी केली जाते
शैक्षणिक सहाय्य
- नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या पाल्यांना पहिली ते सातवी किमान 75% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असेल तर आर्थिक सहाय्य म्हणून 2500 रुपये दिले जाते. यासाठी 75% हजेरी असलेले दाखला देणे आवश्यक.
- कामगाराच्या दोन मुलांना आठवी ते दहावी मध्ये 75% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असेल तर शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून 500/- रुपये प्रति वर्ष दिले जाते.
- नोंदणीकृत कामगार यांच्या दोन मुलांना इयत्ता दहावी ते बारावी मध्ये किमीत कमी 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास आर्थिक सहाय्य म्हणून 10000/- हजार रुपये दिले जाते.
- कामगाराच्या दोन मुलांना पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तक व अन्यसामग्रीसाठी प्रतिवर्षी 20000/- हजार रुपये शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी व साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक वर्षी पदवी अभ्यासक्रमासाठी 100000/- लाख रुपये आणि अभियांत्रिकी पदवीसाठी 60000/- शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
आर्थिक सहाय्य
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या लाभार्थ्यांना किंवा वारसाला आर्थिक सहाय्य म्हणून 500000/- लाख रुपये दिले जाते. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मृत्यू दाखला किंवा कामावर मृत झाले आहे याचे प्रमाणपत्र किंवा पुरावे सादर करणे आवश्यक
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या लाभार्थ्यांना किंवा वारसाला आर्थिक सहाय्य म्हणून 200000/- लाख रुपये दिले जाते त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मृत्यू दाखला सादर करणे आवश्यक.
- नोंदणी कृत बांधकाम कामगार यांच्या घर बांधणीसाठी एकूण 450000/- हजार रुपये अर्थसहाय्य म्हणून दिले जाते त्यामध्ये कल्याणकारी मंडळाकडून 250000/- हजार रुपये तर केंद्र सरकारकडून 200000/- लाख रुपये दिले जाते.
- नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्या लाभार्थ्यांना किंवा वारसाला 10000/- हजार रुपये त्यांच्या अंतिम विधीसाठी मदत म्हणून दिली जाते.
- बांधकाम कामगार घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी बँकेकडून होम लोन घेतलेल्या व्याजाची रक्कम 200000/- ते 1000000/- लाख पर्यंत अनुदान स्वरूपात दिले जाते.
- त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचे पुरावे आवश्यक
- नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी 6000/- हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
PM Kisan Samman Nidhi Yojana Edit
बांधकाम कामगार या योजनेसाठी नोंदणी कशी करावी
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी तुम्हाला mahabocw.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे.
- बांधकाम कामगार नोंदणी साठी होमपेज वरती ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
- तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
- यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्ह्या निवडा
- तुमच्या समोरील बॉक्समध्ये आधार कार्ड नंबर भरायचं आहे
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकून Process to form या बटणावर क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर बांधकाम कामगार नोंदणी अर्ज ओपन होतील त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायचे आहे.
- त्यामध्ये (Personal Details) वैयक्तिक माहिती, (Family Details) कौटुंबिक तपशील, (Permanent Address) कायमचा पत्ता, (Bank Deatils) बँक तपशील, (90 Days Working Certificate) 90 दिवस काम केल्याचा दाखला, (Employers Details) & इतर तपशील.
- वरील सर्व माहिती भरून Save या बटनावरती क्लिक करायचं आहे
- संपूर्ण फॉर्म चेक करून सबमिट या बटणावरती क्लिक करायचा आहे.
अशाप्रकारे तुम्ही बांधकाम कामगार विभागांमध्ये नोंदणी करून विविध योजनेचे लाभ तुम्ही घेऊ शकता. त्या योजना कोणकोणते आहेत त्यासाठी पात्रता त्याचे अटी आणि त्याचे फायदे काय असणार आहेत हे सगळे आपण यामध्ये बघितलो आहोत जर काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद